हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे शिवजन्मोत्सव उत्साहात

मनींदरजीत सिंहजी बिट्टा यांची प्रमुख उपस्थिती

* हजारोंच्या संख्येत शिवप्रेमी सहभागी
* साधना कॉलनीचे मैदान, दस्तूर नगर येथे आयोजन

अमरावती/8 मार्च – हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान अमरावतीतर्फे 11 व्या वर्षीसुद्धा शिवजन्मोत्सव सोहळा थाटामाटात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख वक्ते मनींदरजीत सिंहजी बिट्टा यांचे देशभक्ती विषयावरती मार्गदर्शन लाभले, यावर्षीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नानकराम नेभनानी उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून चंद्रशेखरजी भोंदू उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक अशा शिवराज्यम ढोल ताशा पथकाच्या वादनाने झाली. त्यानंतर शिवराज्याभिषेक नाटक (सिपना कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ) अतिशय सुंदर असे सादर करण्यात आले. स्वराज्य सेवा संस्थेची विदर्भस्तरीय शिवकालीन शस्त्रप्रदर्शनी पाहण्यासाठी उपलब्ध होती. च. ड. बिट्टा साहेबांचे स्वागत कार्यकारी समितीच्या हस्ते झाले. या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आले रायगडावरती दरवर्षी दिवाळी साजरी करणारे गजाननराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. रामरोटीच्या द्वारे समाजाची सेवा करणार्‍या शिवधारा संस्थेचा सत्कार करण्यात आला. गोसेवा करणारे संजय सेंगर यांचा सत्कार करण्यात आला. गडकिल्ले संरक्षण करणार्‍या, सेवा देणार्‍या स्वराज्य सेवा प्रतिष्ठान यांचे सत्कार करण्यात आले. गुरुद्वारा समिती च्या हस्ते श्री. बिट्टा साहेबांचा सत्कार करण्यात आला. शहरातील गणमान्य व्यक्तींच्या स्वागत समितीचा सत्कार श्री. बिट्टा साहेबांच्या हस्ते झाला. हजारोंच्या संख्येत नागरिकांना बसण्याची व्यवस्था कार्यक्रमात करण्यात आली होती. बिट्टाजींना सुरक्षा असल्यामुळे मोठया प्रमाणात व्यवस्था लावण्यात आली होती. श्री. बिट्टा साहेब यांच्या देशभक्तीवर भाषणानी उपस्थित हजारो नागरिकांना मंत्रमुग्ध केले. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग त्यांनी सांगितले. श्रीराम सेतूचे वर्णन त्यांनी सांगितले., राष्ट्र प्रथम ची भावना त्यांनी मांडली व उपस्थित माता-भगिनींनाही उद्देशून प्रत्येक घरात जर छ.शिवाजी जन्माला यायचे असेल तर आपल्याला जिजाऊ बनाव लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली. भारत मातेच्या जयजयकाराने भाषण झाले.भव्य चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरणही या कार्यक्रमात करण्यात आले. 20 महिला भजनी मंडळाच्या हस्ते महाआरती करण्यात आली. हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक धर्माळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, प्रास्ताविक सचिव गौरव केने यांनी केले, आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष मिलिंदजी देशपांडे यांनी केले, कार्यक्रमाचे संचालन उपाध्यक्ष रोहित नवले यांनी केले. प्रतिष्ठान चे अनेक कार्यकर्ते आणी कार्यकारी मंडळातील उत्कर्ष गजरे, दीपक दादलानी, शशांक देशपांडे, वरून मलीये, जितेश पंडित, पराग छांगाणी, स्वराज जाधव, श्रीनाथ पांडे, डॉ. लोभस घडेकर, संजय शादी,महेक तरडेजा,आकाश पवार,विशाल डोंगरे, प्रज्वल माकडे,भूषण खेडकर,पार्थ जोशी,अजिंक्य मुखेडकर,अथर्व कोळेश्वर,अविरत जोशी,आशिष मुळे,कार्तिक शिंगोटे,पियुष कोळेश्वर,प्रथमेश सिंग,वेदांत रत्नपारखी,समीर कुयटे,श्रेयस देशमुख,भावेश बोरकुटे,आदित्य खुळे,जनक मार्डीकर,चैतन्य गंभीरकर,रिद्धेश देशमुख,वेदांत इंगोले,वेदांत अरोकार,कार्तिक बोके,जय गावंडे,ध्रुव,कार्तिक हिरुळकर,तन्मय राऊत,स्वराज इंदूरकर,दर्शन कांबळे,श्रीपाद जोजारे,अनिकेत माथने,यथार्थ राऊत व अनेक कार्यकर्ते यांनी व सर्वांच्या सहकार्याने आपला सांस्कृतिक वारसा जपणारा शिवजन्मोत्सव सोहळा हजारोच्या संख्येत अतिशय उत्कृष्टपणे पार पडला.

संबंधित बातम्या

Back to top button