जिंदा शहीद मनिंदरजीतसिंह बिट्टा यांनी घेतले पद्मश्रींचे आशीर्वाद

श्री हव्याप्र मंडळात नॉर्थ-ईस्ट फेस्टीवला राष्ट्रीय एकतेचे स्वरूप

अमरावती /8 मार्च : अखिल भारतीय दहशतवाद विरोधी मोर्चाचे अध्यक्ष तथा जिंदा शहीद म्हणून प्रख्यात असलेले मनिंदरजीतसिंह बिट्टा यांनी आज शनिवारी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला भेट देत मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांची भेट व त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी पद्मश्री वैद्य साहेब यांचेसह मंडळाच्या सचिव प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके, प्रा. दीपाताई कान्हेगावकर यांनी मनिंदरजीतसिंह बिट्टा, शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्र मुख्य समन्यवयक नानकरामजी नेभनानी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्वप्रथम मनिंदरजीतसिंह बिट्टा यांनी देशभरातील असंख्य विद्यार्थ्यांचे लाडके ताऊ पद्मश्री वैद्य साहेब यांचे निवास्थानी भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. आपणास मंडळाबाबत माहिती आहे, प्रामुख्याने स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, स्वातंत्र्यानंतर देश व समाजहितासाठी सुरू असलेले मंडळाचे कार्य संबंध देशाला माहित आहे. पद्मश्री देश व समाजाचे गौरव असून अमरावती शहराला भेट देतांना त्यांची थोडक्यात का होईना पण भेट घेण्याचे नियोजन फलीत झाले. यावेळी या यशस्वी भेटीसाठी मंडळाच्या माजी विद्यार्थी संघाचे प्रा. आशिष हटेकर, डॉ. ललित शर्मा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

संबंधित बातम्या

Back to top button