पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

अमरावती /6 मार्च : पालकमंत्री चंद्रशेखर बावन कुळे शनिवार, दि. 7 मार्च रोजी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात श्री. बावनकुळे हे सायन्सकोर मैदान येथे दुपारी 1.30 वाजता जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय एकल महिला महासंमेलन आणि वैदर्भी जिल्हास्तरीय प्रदर्शनाला भेट देतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता सांस्कृतिक भवन येथे अमरावती महानगरपालिका आणि एमएआयडीसी यांच्यातील सामंजस्य कराराप्रसंगी उपस्थित राहून त्यानंतर दुपारी 4 वाजता महिला मेळाव्यास मार्गदर्शन करतील. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव राहिल. सायंकाळी 6 वाजता मोर्शी येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता मोर्शी येथे दत्तापाटील गेडाम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील.

Back to top button