क्रांती ज्योती ब्रिगेडतर्फे वि.दा. पवार सन्मानित

अमरावती /1 मार्च : वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण दानाचं महत्त्वाचं कार्य तथा पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणारे प्रभात एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वि.दा. पवार यांना क्रांतीज्योती ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष एड. नंदेश अंबाडकर यांच्या हस्ते त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक,पर्यावरण कार्याचा गौरव करीत शाल, श्रीफळ, सन्मानपत्र,स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
विमलबाई देशमुख सभागृहात क्रांतीज्योती ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित जीवनवेल परिचय पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी स्वागताध्यक्ष डॉ. नीलकंठ यावलकर, डॉ.रामचंद्र शेळके, सुभाष बनसोड, डॉ अशोक उमक, सत्कारमूर्ती नगरसेवक नाना आमले,सुनीता भेले,वंदना मडघे,राजश्री जठाळे, अर्चना पाटील यांच्या उपस्थितीत वि दा. पवार यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सुभाष मालपे, प्रफुल्ल उमक, जितेंद्र वाघ,अशोक पांडे, राजू अबाडकर,रवींद्र पाटील,गजानन माहुरकर, सुरेंद्र धामणकर, नितीन पंध्ये, संजय सरवटकर,झाकीर कुरेशी,मझर अली, संजय वाघुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.




