गडगडेश्वर प्रभागाला सुंदर बनविणार

नगरसेविका अर्चना अशोक पांडे यांची ग्वाही

* स्वच्छता आणि आरोग्य सुविधांना देणार प्राधान्य

अमरावती /26 फेब्रुवारी – महापालिका प्रभाग क्रमांक 17 गड गडेश्वरच्या नव निर्वाचित युवा स्वाभि मान पा र्टीच्या नगर सेविका अर्चना अशोक पांडे यांनी पदभार स्वीकारताच जनसेवेचा धडाका सुरू केला आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रभागात रखडलेली कामे आणि अस्वच्छतेचे साम्राज्य मोडीत काढण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून कामाला सुरुवात केली आहे. प्रभाग कचरामुक्त करणे आणि नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळवून देणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले आहे.
अर्चना पांडे या दररोज सकाळी तीन ते चार तास आपल्या प्रभागाचा दौरा करून स्वच्छता मोहिमेची स्वतः पाहणी करत आहेत. त्यांचे यजमान आणि अनुभवी सामाजिक कार्यकर्ते अशोक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विकास आराखडा राबविला जात आहे. हनुमान नगर ते पार्वती नगर अशा विस्तीर्ण पसरलेल्या या प्रभागात रस्ते, नाल्या आणि पथदिव्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. प्रभागातील दोन अन्य नगरसेवकही त्यांच्याच दलाचे असल्याने समन्वयाने काम करून आदर्श प्रभाग घडवण्याचा त्यांचा मानस आहे. विशेषतः गरीब रुग्णांची होणारी पायपीट थांबवण्यासाठी प्रभागात तातडीने महापालिकेचे रुग्णालय व आरोग्य केंद्र सुरू करण्याचा त्यांचा मुख्य प्रयत्न राहणार आहे. आमदार रवी राणा यांच्या मार्गदर्शनात विकास निधी खेचून आणत झोपडपट्टी परिसरात बालवाड्या सुरू करण्यालाही त्यांनी प्राधान्य दिले आहे. एका गृहिणीपासून लोकप्रतिनिधी पर्यंतचा हा प्रवास त्या आपल्या अनुभवाच्या जोरावर यशस्वी करत आहेत.
आरोग्य सुविधेसाठी मोठा लढा-गडगडेश्वर प्रभागात सध्या शासकीय दवाखाना नसल्याने नागरिकांना उपचारासाठी लांब जावे लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी अर्चना पांडे यांनी प्रभागात सुसज्ज आरोग्य केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जनतेच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

कौटुंबिक आणि सामाजिक बांधिलकी

अर्चना पांडे यांच्या कुटुंबात पुत्र ऋषिकेश हा परिवहन विभागातील कामे सांभा ळतो, तर कन्या खुशी ही प्रगत कला महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आपल्या कुटुंबासह संपूर्ण प्रभागालाच आपले कुटुंब मानून त्यांनी युवकांच्या रोजगारासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विशेष पाऊले उचलण्याचे निश्चित केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button