हायप्रोफाईल जुगार अड्डयावर छापा, दोघांना घेतले ताब्यात
चांदुर रेल्वे पोलीसांची कारवाई

* दुचाकी, चारचाकीसह लाखो रूपयांचा ऐवज जप्त
अमरावती /15 जून: चांदूर रेल्वे पोलिसांनी दिघी कोल्हे शेतशिवारातील रायगड प्रकल्प धरणाच्या बाजुला काही इसम एक्का बादशाहाचा नावाचा हारजित जुगार खेळ खेळत असल्याची गुप्त माहीती शनिवारी 14 जूनला प्राप्त झाली. या आधारावर खासगी वाहनाने ग्राम दिघी कोल्हे शेतशिवारात रायगड प्रकल्प धरणाच्या बाजुला काही इसम गोलाकार बसुन जुगार खेळत होते. सदर इसम हे एक्का बादशाह नावाचा हारजिचा जुगार खेळ खेळत असल्याची पंचाची खात्री पटविण्यात आली. यावेळी जुगार खेळणारे काही इसम पोलिसांना पाहुन पळून गेले. यापैकी दोन इसमांना घटनास्थळावर ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळून नगदी 3100 रू. तिन मोबाईल कि 32000/रू 1) एमएच- 27/डीव्ही 7269 निळया रंगाची मारूती सुझुकी कंपनीची एस कॉस कार अंदाजे किंमत 7,00,000/8. 2) एमएच 32/ सी-8118 सिल्व्हर रंगाची टोयोटो कंपनीची इनोवा गाडी किंमत अंदाजे 10,00,000/रू, 3) जेजे 05 एलजे 6166 हिरो स्पेल्डर काळा लाल पट्टा असलेली मो.सा. अंदाजे किंमत80,000/रू, 4) एमएच-27, टी-0772 हिरो स्पेल्डर काळा रंगाची असलेली अंदाजे किंमत 50,000/रू 5) एमएच 05 बीएन 5401 काळया रंगाची युनिकार्न मो सा अंदाजे किंमत 90,000/रू, 6) सिल्व्हर रंगाची होंडा शाईन विना कमाकाची मो.सा.अंदाजे किंमत 85,000/रू. 7) एमएच 27 डीएम 1670 काळया व लाल पटयाची होडा शाईन कंपनीची मो.सा.अंदाजे किंमत 80,000/रू. असा एकुण 21,20,100/रू चा मुददेमाल पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेण्यात आला. आरोपी 1) मंगेश दादाराव रामटेके वय 36 वर्ष, रा पळसखेड 2) राहुल गुरूनाथ मेश्राम वय 42 वर्ष रा दिघी कोल्हे फरार 3) सचिन घनश्यामजी लोहीया रा. चांदुर रेल्वे फरार 4) नन्हा देशमुख रा. पळसखेड फरार 5) पंजाब उईके रा. नांदगाव खंडेेशर फरार 6) विक्की सुरेशराव माहुरे रा. पळसखेड 07) फरार निलेश अंडेवाला रा. नांदगाव खंडेश्वर अधिक 03 ते 04 इसम यांचेवर कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक विशाल आनंद,अपर पोलीस अधिक्षक सा. पंकज कुमावत, उपविभागीस पोलीस अधिकारी, अनिल पवार, यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक अजय आकरे, पोउपनि सुयोग महापुरे, पोउपनि नितेश आझडे, श्रेपोउपनि नंदलाल लिंगोट, पोलीस अंमलदार शिवाजी घुगे, योगेश नेवारे, निलेश रिठे, गजानन वाघमारे, प्रविण मेश्राम, दुर्गेश इंदुरकर, राहुल वानखडे, प्रशांत ढोके, मंगेश गेडाम, प्रदीप पाटील यांनी केली.




