पशुधन कल्याण आणि ग्रामीण उपजीविका उपक्रमाचा 8 वा पशु विकास दिन उत्साहात

अमरावती/23 फेब्रुवारी : पशुधन कल्याण आणि ग्रामीण उपजीविका उपक्रमाचा 8 वा पशु विकास दिन (पीव्हीडी) यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला.‘सर्वोत्तम सेवा: पशु, परिवार आणि प्रगती’ या संकल्पनेवर आधारित एसएमएफजी इंडिया क्रेडिटच्या या उपक्रमाने पशुधनाचे आरोग्य, कुटुंबाचे कल्याण आणि शाश्वत प्रगती यांना बळकटी देत सर्वांगीण ग्रामीण विकासाबाबत संस्थेची बांधिलकी अधिक दृढ केली.2014 मध्ये सुरू करण्यात आलेला पशु विकास दिन हा उपक्रम पशुपालन करणार्या व्यक्तींच्या अत्यावश्यक आरोग्य गरजांकडे लक्ष देतो आणि त्यांना मोफत पशुवैद्यकीय सेवा व तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देतो. गेल्या काही वर्षात हा उपक्रम देशातील सर्वात मोठ्या एकदिवसीय पशुधन कल्याण कार्यक्रमांपैकी एक म्हणून विकसित झाला आहे.एसएमएफजी इंडिया क्रेडिटने 1.55 लाखांहून अधिक जीवनांवर सकारात्मक प्रभाव साधला असून, यात सुमारे 1.4 लाख गुरांवर उपचार तसेच 14,000 हून अधिक लोकांना आरोग्यसेवा सहाय्य देण्यात आले. त्यायोगे 30,000 हून अधिक कुटुंबांना लाभ झाला. हा उपक्रम 16 राज्यांमध्ये आणि एसएमएफजी ग्रामशक्तीच्या 510 शाखांमध्ये राबविण्यात आला. त्यातून कंपनीची ग्रामीण भारतातील सखोल पोहोच दिसून येते.महाराष्ट्रात पशु विकास दिन 59 ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि 19,000 हून अधिक जनावरांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या.




