राष्ट्रसंत पुण्यतिथी व मातृ-पितृ पूजन कार्यक्रमात मतिमंद शाळेस सहकार्य

अमरावती /23 फेब्रुवारी : दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रकाश तारेकर यांच्या पुढाकाराने तारेकर परिवारातर्फे आयोजित यंदाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 57 वे पुण्यस्मरण व मातृ-पितृ पूजन कार्यक्रम प्रसंगी राजापेठ येथील स्व दौलतभाई देसाई मतिमंद मुलांचे शाळेस आवश्यक साहित्य एक कुकर प्रदान करण्यात आला. गुरुदेव प्रार्थना मंदिर मोर्शी रोड येथे वंदनीय लक्ष्मण दास काळे महाराज यांच्या काल्याचे किर्तन प्रसंगी सहदेवराव व स्व लीलाबाई तारेकर स्मृती प्रितर्थ कार्यक्रमाचे अनेक कार्यक्रमात हा कार्यक्रम पार पडला. वंदनीय काळे महाराज व प्रकाश तारेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साबळे महाराज हरिभाऊ वेरुळकर गुरुजी गव्हाणे महाराज राजेंद्र अडकुलवार प्रल्हादराव पारिसे अशोक व राजेंद्र चारेकर इत्यादींच्या हस्ते शाळेचे अध्यक्ष डॉ. शरद भोयर मुख्याध्यापक जीवन गोरे व शाळेचे कार्यकर्ते डॉ. गोविंद कासट यांनी साहित्याचा स्वीकार केला. महाराजांचे भक्तगण तारेकर परिवार व निमंत्रित मंडळी मोठ्या संख्येने हजर होती.

संबंधित बातम्या

Back to top button