दादांसोबत विलिनीकरणावर चर्चेचा सुप्रिया सुळेंचाही दावा
दादांच्या इच्छा आणि आशीर्वादाने जे होईल ते...

मुंबई/12 फेब्रुवारी – अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्या आज दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होत्या. माझं आणि दादामध्ये विलीनीकरणावर चर्चा झाली होती. आमच्यातलं बोलणं दादाला माहिती होतं, असं सुप्रिया सुळेंनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि बर्याच लोकांना बर्याच गोष्टी माहिती आहे, पण अनेक वेळा लोकांना मी हे बोललेलं आवडत नाही. पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, माझं पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहिला, त्याच्यामुळे आता काय जुन उगच कुणाच्या बद्दल काय काढावं. माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे, आणि ते वास्तव आहे. आणि ते बर्याच लोकांना माहिती आहे.




