भारती अंबाडकर यांचा उपेक्षित समाज महासंघाचेवतीने गौरव

क्रांतिज्योती सावित्रीआईची लेक

अमरावती /12 फेब्रुवारी : स्थानिक महात्मा फुले कॅालनी येथे उपेक्षित समाज महासंघ ह्या समाजसेवी संस्थेच्या वतीने मराठी भाषेतील कवितेच्या संदर्भात सखोल अध्ययन, संशोधन व लेखन करीत असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीआईची लेक सौ. भारती मनोज अंबाडकर यांना पुष्पगुच्छ, फुले दाम्पत्यांची प्रतिमा व अस्पृश्यांची कैफियत हे विचारपुष्प देवून नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्यांना महासंघाचे अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड, माळी समाज ऋणानुबंधचे वसंतराव भडके, कामगार नेते श्रीकृष्णदास माहोरे, महिला आघाडीच्या सौ. प्रविणा ओमप्रकाश अंबाडकर, स्मिता संजय घाटोळ, डॅा. उज्ज्वला मेहरे, सौ. सुनंदा बनसोड आदिंनी शुभेच्छा दिल्या, असे प्रसिध्दी प्रमुख गोविंद फसाटे कळवितात.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button