श्री हव्याप्र मंडळाच्या आठ विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाकरिता रशियात भरारी

आंतरराष्ट्रीय समन्वयक प्रा. प्रणव चेंडके यांची फलश्रुती

* पद्मश्रींच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार

अमरावती /6 जानेवारी : भारतीय पारंपारीक व आधुनिक क्रीडा शिक्षण प्रशिक्षणात जागतिकस्तरावर लौकीक साधलेल्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने आता जागतिक शिक्षण क्षेत्रामध्येही लौकिक साधला आहे. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचा पुढाकार आणि मंडळाचे आतंरराष्ट्रीय समन्वयक प्रा. प्रणव चेंडके यांचे आतंराष्ट्रीयस्तरावर यशस्वी कार्यामुळे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व रशियाच्या सोची येथील बहूप्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय ऑलेम्पीक विद्यापीठाशी झालेल्या शैक्षक्षिण करार अंतर्गत मंडळातील आठ विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाकरीता निवड करण्यात आली आहे. या निमीत्त्याने पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनाखाली एका शुभेच्छापर निरोप सोहळ्याचे आयोजन नुकतेच पार पडले. श्री हव्याप्र मंडळाचे आतंराष्ट्रीय समन्वयक प्रा. प्रणव चेंडके यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळामध्ये शिक्षण घेत असलेली एस्टोनिया देशातील विद्यार्थी नोनोल्फे सिबानोझे बीपीइएस प्रथम वर्ष, ल्हाम्व तमंग, एमपीएड द्वितीय वर्ष, प्रतिक्षा पोद्याल एमपीएड द्वितीय वर्ष, जीवान चेत्री एमपीएड प्रथम वर्ष, रिनचेन भुताई बीपीएड प्रथम वर्ष, ग्रिकबेन चमोमतन बीपीईएस तृतीय वर्ष, सगनीक ताथ बीपीईएस द्वितीय वर्ष, विझोमे केन्नोई बीपीईएस प्रथम वर्ष या आठ विद्यार्थ्यांसह सहा. प्रा अंबर देबनाथ, सहा. प्रा. पुष्पक खोंडे अशी अकरा सदस्यीय चमु रशियाला रवाना होत आहे. त्या अनुषंगाने प्रथम कॉन्फरन्स हॉल येथे प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके व प्रा. प्रणव चेंडके यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रवास संदर्भात व रशिया येथे शिक्षण घेत असतांना आवश्यक सुचना देत सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्यात. डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजीत या सोहळ्याला पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्यासह मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके, कोषाध्यक्ष व डिसीपीई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे, प्रा. दिपाताई कान्हेगावकर, डॉ. लक्ष्मीकांत खंडागळे, डॉ. दिनानाथ नवाथे, परिक्षा नियंत्रक डॉ. विजय पांडे, प्रा. संजय तिरथकर, प्रा. वर्मा मॅडम, प्रा. प्रणव चेंडके यांच्यासह उच्च शिक्षणासाठी निवड झालेले विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचेहस्ते सर्व निवड झालेल्या आठ विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देत त्यांना शुभेच्छा व शाबासकी देण्यात आली. यानंतर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button