रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाचा झटका

नवी दिल्ली : सर्वोच्च न्याया लयाने मंगळवारी महाराष्ट्र क्रिकेट असो सिएशन (एमसीए) च्या निवड णुकांवर मुंबई उच्च न्यायालयाने लावलेली स्थगिती उठवण्यास नकार दिला. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचोली यांच्या खंडपीठाने एमसीएवर एक अत्यंत संक्षिप्त पण कठोर निरीक्षण नोंदवले. स्थगिती योग्य आहे. त्यांनी (मुंबई उच्च न्यायालयाने) तुम्हाला मोठा घोटाळा करण्यापासून रोखले, आमच्याकडून आणखी टीका करून घेऊ नका, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.




