अ.भा. आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल (पुरुष) स्पर्धेच्या तिसर्या दिवशी रंगले चुरशीचे सामने

अमरावती /3 फेब्रुवारी : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या यजमानपदाखाली श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय येथे सुरू असलेल्या ’अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल (पुरुष) स्पर्धेत तिसरा दिवस अतिशय चुरशीचा ठरला. विविध विद्यापीठाच्या संघांनी मैदानात जोरदार कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली. सकाळी अण्णा विद्यापीठ विरुध्द गुरुकुल कांगरी विद्यापीठ, हरिव्दार यांच्यात झालेल्या लढतीत गुरुकुल कांगरी विद्यापीठ संघ विजयी झाला, दुस-या लढतीत भारतीयार विद्यापीठ संघ एकतर्फी विजयी ठरला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर विरुध्द जय नारायण व्यास विद्यापीठ संघात झालेल्या लढतीत नागपूर विद्यापीठ संघ विजयी झाला. माधव विद्यापीठ, पिंडवाडा, राजस्थान विरुध्द गोंडवाणा विद्यापीठ संघात झालेल्या लढतीत माधव विद्यापीठ संघ विजयी झाला.
दुपारच्या सत्रात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक विरुध्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांंच्यात झालेल्या सामन्यात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ संघ विजयी ठरला. राजस्थान विद्यापीठ, जोधपूर विरुध्द भोपाळ विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थान विद्यीपीठ संघ विजयी ठरला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विरुध्द पीटीआरएस विद्यापीठ, रायपूर यांच्यात झालेल्या सामन्यात पुणे विद्यापीठ संघ विजयी झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव विरुध्द पीडीयूएस सिकर यांच्यातील सामना जळगांव विद्यापीठ संघाने जिंकला. रायपूर विद्यापीठ विरुध्द भोपाळ विद्यापीठातील सामना रायपूर विद्यापीठाने जिंकला. मणिपूर विद्यापीठ विरुध्द संजीवनी विद्यापीठ, अहिल्यानगर यांच्यातील सामना संजीवनी विद्यापीठ संघाने जिंकला.
काल दि. 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यांमध्ये जळगांव विद्यापीठ, इंदौर विद्यापीठ, राजस्थान विद्यापीठ, जयपूर, भोपाळ विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, एल.पी.यू. विद्यापीठ, एसएमके विद्यापीठ, बास्टर, संजिवनी विद्यापीठ, अहमदनगर, रायपूर विद्यापीठ, एचवायव्ही दुर्ग विद्यापीठ, एमडीएस अजमेर विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे, आरजेकेयूटी विद्यापीठ, माधव विद्यापीठ आणि बीयूसी विद्यापीठ हे विद्यापीठांच्या संघांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यांना पराभूत करुन विजय मिळविला. दि. 4 फेब्रुवारी रोजी होणारे सामने अटीतटीचे होणार असून विद्यापीठाच्या बलाढए संघादरम्यान लढत होईल.




