शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रासेयो सात दिवसीय निवासी शिबीर

ग्राम कठोरा येथे सामाजिक बांधिलकीचा आदर्श

अमरावती/3 फेब्रुवारी : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीच्या राष्ट्रीय सेवा योजना (छडड) विभागाच्या वतीने दिनांक 19 ते 25 जानेवारी या कालावधीत ग्राम कठोरा येथे सात दिवसीय निवासी शिबिराचे अत्यंत यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये महाविद्यालयातील एकूण 50 राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी सक्रिय व उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून सामाजिक जाणीव व सेवाभावाचे उत्कृष्ट दर्शन घडविले. शिबिराचा उद्घाटन समारंभ दिनांक 20 जानेवारी रोजी कठोरा येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पार पडला. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. ए. एम. महल्ले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मा. अनिल भटकर साहेब, उपजिल्हाधिकारी, अमरावती हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. शीतल बिजवे, रा. से. यो. सहसमन्वयक डॉ. प्रशांत पाईकराव, डॉ. राजेश शर्मा व प्रा. हर्षा रेवतकर यांची मान्यवर उपस्थिती लाभली. उद्घाटनप्रसंगी शाळेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला.
शिबिराच्या कालावधीत विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले. स्वच्छ भारत अभियान, मतदान जनजागृती तसेच सिकलसेल अ‍ॅनिमिया या महत्त्वाच्या विषयांवर स्वयंसेवकांनी प्रभावी पथनाट्य सादर करून ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण केली. यासोबतच गावामध्ये विशेष वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वैद्यकीय शिबिरात औषध वैद्यकशास्त्रतज्ञ डॉ. गणेश बनसोड, स्त्रीरोगतज्ञ डॉ. तनया देशमुख, दंतवैद्य डॉ. प्राजक्ता फलके व डॉ. गौरव फलके तसेच बालरोगतज्ञ डॉ. प्रज्ञा बनसोड यांनी ग्रामस्थांची मोफत आरोग्यतपासणी करून आवश्यक औषधे वितरित केली. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळाली. याशिवाय गावातील शैक्षणिक स्थिती, सामाजिक परिस्थिती तसेच शेती व कृषीविषयक अडचणी समजून घेण्यासाठी सविस्तर सर्वेक्षण करण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button