रस्ते दुरुस्ती व आरोग्य सेवेच्या कामास प्राधान्य
प्रभाग 7 चे नगरसेवक श्रीचंद तेजवानी यांची माहिती

सहकार नगर मैदानाचा करणार कायापालट
अमरावती / 27 जानेवारी – महानगर पालिकेच्या प्रभा ग क्रमांक 7 मधील जवाहर स्टेडि यम विभा गातून दुसर्यांदा विजयी झालेले लोकप्रतिनिधी श्रीचंद तेजवानी यांनी आता आपल्या कार्यक्षेत्राच्या विकासाचा नवा नकाशा आराखडा तयार केला आहे.
कृष्णा नगर ते कापूस बाजार या मुख्य रस्त्याची झालेली दुरवस्था थांबवून तो मार्ग तत्काळ दुरुस्त करणे, डफरीन मार्गाचे डांबरीकरण पूर्ण करणे आणि महानगरपालिका विभागीय कार्यालयापर्यंतचा प्रवास सुकर करणे ही त्यांची प्रमुख उद्दिष्टे आहेत. मागील चार वर्षांतील प्रशासकीय राजवटीमुळे स्वच्छतेचा जो प्रश्न निर्माण झाला आहे, तो सोडवण्यासाठी त्यांनी प्रत्येक वस्तीत कचरा संकलन गाडी पोहोचवण्याचा आणि दररोज स्वच्छतेचा आढावा घेण्याचा संकल्प केला आहे. केवळ रस्तेच नव्हे, तर विलास नगर येथील दवाखान्याप्रमाणेच झोपडपट्टी परिसरात नवीन आरोग्य केंद्रे उभारणे आणि तरुणांसाठी सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून देणे यासाठी त्यांनी पावले उचलली आहेत. सहकार नगर मैदानाचे नूतनीकरण करून तिथे व्यायामशाळा आणि उद्यानांची निगा राखण्याला त्यांचे प्राधान्य असेल. ’बढते कदम’ संस्थेच्या सामाजिक कार्याची शिदोरी आणि जनसामान्यांचा पाठिंबा यांच्या जोरावर प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तेजवानी आता अधिक आक्रमकपणे कार्य करताना दिसतील.
विकासाची पंचसूत्री
प्रभागातील नागरिकांना अडचणी आणि समस्या यापासुन मुक्त करण्यासाठी श्रीचंद तेजवानी यांनी पाच महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण, कचरामुक्त प्रभाग, वस्त्यांमध्ये नवीन आरोग्य केंद्रे, मुलांसाठी आधुनिक अभ्यासिका आणि सहकार नगर मैदानाचा सर्वांगीण विकास यांचा समावेश आहे. जनतेचे आरोग्य आणि सुविधा हेच त्यांचे अंतिम ध्येय आहे.




