पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व शिक्षण मंत्री दादा भुसे आज जिल्हा दौर्‍यावर

दादा भुसेंच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

अमरावती / 25 जानेवारी – जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज 26 जानेवारी रोजी जिल्हा दौर्‍यावर येणार असुन तिवसा येथे भाजपा अमरावती जिल्हा ग्रामिण व रविराज देशमुख मित्र परीवाराकडून आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय भव्य जंगी किसान शंकरपटाला उपस्थित राहणार आहे.
भाजपा अमरावती जिल्हा ग्रामिण व रविराज देशमुख मित्रमंडळाच्या वतीने हा राष्ट्रीय जंगी किसान शंकरपट सध्या तिवसा येथे आयोजित करण्यात आला आहे. या शंकरपटात विदर्भातील अनेक बैलजोड्यांनी सहभाग घेतला असुन तालुक्यातील शंकरपट प्रेमींसाठी हा एक आगळीवेगळी मेजवाणी ठरला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे दि. 25 आणि दि. 26 जानेवारी 2026 रोजी जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यादरम्यान ते अमरावती येथे आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहणार आहेत. दौर्‍यानुसार भुसे यांचे रविवार, दि. 25 जानेवारी रोजी रात्री 10.10 वाजता बडनेरा येथे आगमन होईल, त्यानंतर ते अमरावती शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करतील. सोमवार, दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 9.15 वाजता अमरावती शहर परेड मैदान, पोलीस मुख्यालय येथे भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 12.45 वाजता ते अमरावतीहून नागपूर विमानतळाकडे रवाना होतील.

संबंधित बातम्या

Back to top button