पी.आर.पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये आनंद मेळावा

अमरावती /25 जानेवारी : पी. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकताच आनंद मेळ्याचे भव्य व उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या आनंद मेळ्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आनंद, सर्जनशीलता, संघभावना व उद्योजकीय कौशल्यांचा विकास करणे हा होता.
आनंद मेळ्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, खेळ, हस्तकला वस्तू, तसेच मनोरंजनात्मक उपक्रम सादर केले. रंगीबेरंगी सजावट व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शाळा परिसर आनंदमय वातावरणाने भरून गेला होता. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, मेहनतीचे व आत्मविश्वासाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. पालक व शिक्षकांनीही या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष , शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्री प्रायमरी इन्चार्ज यांची उपस्थिती लाभली. हा आनंद मेळा विद्यार्थ्यांसाठी एक आनंददायी व अविस्मरणीय अनुभव ठरला.




