अमरावतीत रंगला शिवसेना महिलाशक्तीचा अभूतपूर्व जागर
पारंपारिक उखाणे स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

* हळदी कुंकू समारंभातून संस्कृतीचे जतन आणि संवर्धन
अमरावती / 25 जानेवारी – सांस्कृतिक वारसा आणि महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अमरावतीतील जुनी कोतवाळी भाजी बाजार भागात एका भव्य हळदी-कुंकू व उखाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहर प्रमुख प्रविण हरमकर आणि सौ. विशाखा प्रविण हरमकर यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पार पडलेल्या या सोहळ्याने अमरावतीकरांचे डोळे दिपवून टाकले.
आ.सुलभाताई खोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मनीषाताई टेंबरे व लक्ष्मीताई शर्मा यांच्या हस्ते विजेत्या रणरागिणींना पैठणीसह आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सुमारे 1500 महिलांच्या उपस्थितीने हा परिसर भगवामय झाला होता. शनिवार 24 जानेवारी रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात महिलांच्या सृजनशीलतेला वाव मिळाला. 50 स्पर्धकांमध्ये रंगलेल्या चुरशीच्या उखाणे स्पर्धेत स्वाती नांदुरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावून मानाची पैठणी साडी आपल्या नावे केली. द्वितीय क्रमांकावर सौ. रेखा देवे ग्रान्डर तर तृतीय क्रमांकावर सौ. मिता नौगईया यांनी बाजी मारली. सहभागी पहिल्या वीस महिलांना स्वच्छतादूत म्हणून कचरापेटी देऊन सन्मानित करण्यात आले. प्राध्यापक सौ. रूपालीताई आरणकर यांनी अतिशय सूक्ष्मपणे परीक्षक म्हणून काम पाहिले. या संपूर्ण कार्यक्रमात आलेल्या प्रत्येक महिलेला वाण देऊन त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला या स्नेहाच्या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी माधुरी अनासाने, वनमाला करुले, पुनम हरमकर, भारती मरोडकर, पुनम अनासाने, पुजा सोलंकी, शिल्पा दवे, प्रियांका करुले, उज्वला खडेकार, स्नेहल करुले, दिपा अनासाने, नैना पारेख, स्वाती पंचवटे, अपर्णा मरोडकर, प्रिया मरोडकर आणि आरती करुले यांसह अनेक निष्ठावान महिला कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.




