एआय. आधारित ह्रुमन रिसोर्स प्लॅनिंग सिस्टीमसाठी डॉ.रत्नशील खोब्राागडे यांना पेटेन्ट

अमरावती /23 जानेवारी : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. रत्नशील खोब्राागडे यांना कृत्रिम बुध्दीमत्ता आधारित ह्रुमन रिसोर्स प्लॅनिंग सिस्टीम फॉर ऑर्गनायझेशनल परफॉर्मन्स या अभिनव प्रणालीस भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत डिझाईन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या डिझाईनची नोंदणी दि. 16 सप्टेंबर, 2025 रोजी करण्यात आली आणि डिझाईन नियम 2001 अंतर्गत मंजूर करण्यात आली आहे. सदर डिझाईन वर्ग 14-02 मध्ये नोंदणीकृत करण्यात आली आहे. या संशोधनात्मक आणि नवोन्मेषी प्रणालीचे संशो धक म्हणून डॉ. रत्नशील खोब्रा गडे यांच्यासह डॉ. महेंद्र मकेसर, डॉ. शिखा मक्कर व शीतल गाडेकर, डॉ. पुंगोडी सेन्थिल कुमार, दिव्या गर्ग, सौ. दीक्षा गर्ग आणि सौ. अंकिता शेंडे यांची नावे नोंद विण्यात आली आहेत. ही एआय आधारित प्रणाली संस्थेतील मानव संसाधन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम, अचूक आणि परिणामकारक करण्यासाठी उपयुक्त ठरणार असून कर्मचारी कार्यक्षमता, नियोजन, निर्णय प्रक्रिया आणि संस्थात्मक कामगिरी सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे शैक्षणिक, औद्योगिक आणि प्रशासकीय क्षेत्रात या प्रणालीचा व्यापक वापर होऊ शकेल. हे यश संशोधन, नवोन्मेष आणि बौद्धिक संपदा क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे तसेच संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मो. अतीक यांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button