नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना विभागीय आयुक्तालयात अभिवादन

अमरावती /23 जानेवारी : भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते व आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन केले.जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अपर आयुक्त सुरज वाघमारे, संजय जाधव, उपायुक्त संतोष कवडे, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. मतदारदिनाची शपथ राष्ट्रीय मतदार दिनाच्या औचित्याने यावेळी विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी उपस्थित अधिकारी- कर्मचार्यांना मतदार दिनाची शपथ दिली.




