सुशासन आणि प्रशासन तंत्र’ पुस्तकाचे आज प्रकाशन
डॉ.कीर्ती पिंजरकर लिखित कौटिल्यप्रणित

अमरावती /23 जानेवारी : अमरावती येथील श्री हरिचंद्र हॉटेलमध्ये उद्या शनिवारी 24 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता डॉ. कीर्ती राम पिंजरकर यांच्या ‘कौटिल्यप्रणीत सुशासन आणि प्रशासन तंत्र’ या विशेष ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रंगणार आहे. संस्कृत भाषेतील गाढ्या अभ्यासक आणि आदर्श प्राथमिक शाळेतील शिक्षिका असलेल्या डॉ. पिंजरकर यांनी कौटिल्याच्या प्राचीन सिद्धांतांना आधुनिक काळाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या पुस्तकातून केले आहे. माजी पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या कार्यक्रमाला ऋद्धपूर मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावंकर आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश मुगल यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यावेळी मुख्य वक्ते म्हणून भारतीय इतिहास व संस्कृतीचे संशोधक प्रा. हेमंत राजोपाध्ये आपले विचार मांडणार असून पद्यगंधा प्रकाशनाचे अभिषेक जाखडे व सिद्धार्थ प्रकाशनाचे शिवाजी धुरी यांची देखील प्रमुख उपस्थिती राहणार आहे.हा ग्रंथ केवळ इतिहासाची पाने उलटणारा नसून आजच्या काळातील ज्वलंत समस्यांवर कौटिल्याच्या नजरेतून प्रकाश टाकणारा एक दस्ताऐवज आहे. यामध्ये कौटिल्याने मांडलेली ‘बहुजनहिताय बहुजनसुखाय’ ही संकल्पना कशी काळाच्या पुढची होती, हे लेखिकेने अतिशय मार्मिकपणे मांडले आहे.




