युवा संशोधकांनी समाजाला विज्ञाननिष्ठ बनवावे
प्रा.बनसोड यांचे प्रतिपादन

अमरावती /21 जानेवारी : माळी समाजातील युवा संशोधकांनी समाजाला अंधश्रध्देच्या जोखडातून मुक्त करुन विज्ञाननिष्ठ बनवावे. समाजाला रचनात्मक दिशा मिळण्यासाठी मार्गदर्शन करावे. असे आवाहन समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी केले. ते माळी समाज ऋणानुबंध महिला आघाडी व वर्हाड विकास च्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदीर परिसर येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे वतीने संशोधनाबद्दल पी.एच.डी. प्रदान केल्याबद्दल प्रा.सौ. सुप्रिया आल्हाद मेहरे यांचे सत्कारप्रसंगी बोलत होते. प्रारंभी विद्येची देवता क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांना अभिवादन करण्यात आले. डॅा. सुप्रिया मेहरे यांना शाल, पुष्पगुच्छ, फुले दाम्पत्यांची प्रतिमा व डॅा. प्रविण बनसोड लिखित विचारपुष्प देवून सन्मानीत करण्यात आले. सर्वशाखीय माळी समाज महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा स्मिता संजय घाटोळ , कार्याध्यक्षा प्रा.डॅा. उज्ज्वला सुरेश मेहरे आदिंनी शुभेच्छापर विचार व्यक्त केले. तेव्हा सौ. सुनंदा बनसोड, सौ. शिल्पा खवले (सरपंच), सौ. कविता नरेंद्र पाचघरे (पोलीस पाटील), सौ. किर्ती निलेश म्हसकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. सौ. रेखा खैरे यांनी आभार प्रदर्शन केले.




