जिल्हा परिषद शाळा उत्तमसरा येथे अरुणोदय सिकलसेल अभियान

7 फेब्रुवारीपर्यंत विविध उपक्रम

अमरावती/21 जानेवारी -पंचायत समिती भातकुली मधिल आयुष्यमान आरोग्य मंदिर उत्तमसरा अंतर्गत जिल्हा परिषद शाळा उत्तम सरा येथे अरुणोदय सिकलसेल अभियान राबविण्यात आले, यामध्ये डॉक्टर सोनाली देशमुख यांनी सिकलसेल विषयी विस्तृत माहिती सांगण्यात आली.
ज्या निमिया मध्ये रक्तपेशींचा आकार विळाप्रमाणे अर्ध चंद्राकृती होतो त्याला सिकलसेल असे म्हणतात .सिकल सेलचे दोन प्रकार असतात एक हे सिकलसेल ग्रस्त आणि सिकलसेल वाहक सिकलसेल हा आनुवंशिक आजार आहे सिकलसेल मध्ये रक्त पेशींचा चा आकार वी ळाप्रमाणे झाल्यामुळे रक्तप्रवाह मध्ये अडथळा निर्माण होतो त्यामुळे अंग दुखणे, पोट दुखणे, सतत थकवा जाणवणे, वारंवार जंतूचा संसर्ग होणे असे लक्षणे यामध्ये आढळतात सिकलसेल ची तपासणी लग्नापूर्वी करणे महत्त्वाचे आहे कारण एक वाहक आणि एक ग्रस्त यांनी लग्न करू नये तसेच दोन वाहक यांनी देखील लग्न करू नये तसेच दोन ग्रस्त यांनी देखील लग्न करू नये कारण यामुळे त्यांच्या होणारे बाळ हे सिकलसेल ग्रस्त होण्याचे चान्सेस जास्त असते आणि सिकलसेल ग्रस्त मातेने गरोदर राहिल्यास पहिल्या तीमही मध्येच गर्भजलाची परीक्षण करून घ्यावे. सिकलसेल लोकांना फॉलिक ऍसिडच्या गोळ्या दिल्या जातात कारण त्यामुळे नवीन रक्तपेशींची निर्मिती होते सिकलसेल लोकांनी पाणी भरपूर प्यावे, हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे खूप जास्त एक्झरशन करू नये. उपकेंद्रस्तरावर सिकलसेल साठी सोलबलिटी टेस्ट केल्या जाते यामध्ये सकारात्मक परिणाम आल्यास त्या लाभार्थ्यांना हल इलेक्ट्रोफोरेसिस साठी जिल्हा रुग्णालयात संदर्भित केल्या जाते तिथे वाहक आणि ग्रस्त डड असे दोन प्रकार केले जातात. वाहक लोकांना पिवळे गाठ दिले जाते आणि ग्रस्त लोकांना लाल कार्ड दिल्या जातात तसेच औषधोपचार मोफत केला जातो. शासनामार्फत सिकलसेल ग्रस्त रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत धर्म हा अडीच हजार रुपये मिळतात, तसेच जे सिकलसेल ग्रस्त विद्यार्थी बोर्डाचे परीक्षेत आहेत त्यांना एक तासांच्या मागे वीस मिनिटं जास्तीचे मिळतात, त्यांना दिव्यांग सर्टिफिकेट मिळते, रेल्वे प्रवासात 50% सूट मिळते. सिकलसेल ग्रस्त रुग्णाचा मोफत औषधोपचार व समुपदेशन करण्यात येते अरुणोदय सिकलसेल अभियान 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत राहणार आहे, हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन , सरपंच श्री धर्मेंद्र मेहरे,पोलिस पाटिल सचिन सवाई,रत्नादिप सवाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्वेता सालफळे, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण खराटे, उपकेंद्र उत्तम सरांच्या डॉक्टर सोनाली देशमुख,, आरोग्य सहाय्यक श्री आकाश हिंगलासपुरे, आरोग्य सविका मंगला वानखेडे,आरोग्य सेवक श्री चेतन राठोड, सिकलसेल समुपदेशक मेघा चर्जन यांनी केले आहे.यावेळी जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मिनांक्षी इंगळे,मुख्याध्यापक लोमेश खैरकर,संतोष कुर्हेकर,शितल भोपळे मॅडम,राजेश सावरकर,गजानन योलोने,प्रमोद कांबळे आणि इतर शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी या सर्वांनी अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केले.

संबंधित बातम्या

Back to top button