इलयाराजा यांना पद्मपाणि पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ भारतीय संगीतकार पद्मविभूषण

मान्यवरांच्या हस्ते 28 ला होणार गौरव
छत्रपती संभाजीनगर/18 जानेवारी -जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्या2 अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आली आहे. बुधवार 28 जानेवारी ते रविवार 1 फेब्रुवारी 2026 या दरम्यान हा महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतर राष्ट्रीय पातळी वरील कला वंताच्या मांदि याळीत संपन्न होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणि पुरस्कार चित्रपट संगीताला नवी दिशा देणारे ज्येष्ठ भारतीय संगीतकार, पद्मविभूषण इलयाराजा (राज्यसभा सदस्य) यांना जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची घोषणा महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम व महोत्सवाचे मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी केली आहे. पद्मपाणि पुरस्कार निवड समितीने इलयाराजा यांची निवड केली असून या समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक लतिका पाडगांवकर तर सदस्यपदी चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर व चंद्रकांत कुलकर्णी यांचा समावेश होता. पुरस्काराचे स्वरूप पद्मपाणि सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व दोन लक्ष रूपये असे आहे. पद्मपाणि पुरस्कार प्रदान सोहळा मान्यवरांच्या हस्ते महोत्सव उद्घाटन कार्यक्रमात 28 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. तर महोत्सव पुढील पाच दिवस आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ इलयाराजा यांनी भारतीय चित्रपटसंगीतात सातत्यपूर्ण आणि सर्जनशील योगदान दिले आहे. आतापर्यंत त्यांनी 7,000 हून अधिक गाणी तसेच 1,500 पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संगीत निर्मिती केली आहे.




