आनंदवनी स्वरानंदवन मंच संचालक दिव्यांग शर्मा पठाणचा सत्कार

अमरावती /18 जानेवारी : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रद्धेय बाबा आमटे यांच्या आनंदवनाला आनंद वनमित्र डॉ. गोविंद कासट यांच्या मार्गदर्शनात शहरातील व्हीएमव्ही परिसरातील पीटी गावंडे अध्यक्ष असलेल्या संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळातील 46 सदस्यांनी आनंदवनला भेट दिली. त्यावेळी एका अतिशय हृदयस्पर्शी आनंदवनातील स्वरानंदवन आर्केस्ट्राची भेट घडवून आली. सर्व भारतभर विविध ठिकाणी कार्यक्रम झालेल्या या अमेरिका येथे कार्यक्रम होऊ घातलेला अंध अपंग मूकबधिर मतिमंद बेरोजगार तसेच कुष्ठ बांधवांनी बाबांचे सुपुत्र डॉ. विकास व भारती आमटे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या स्वरानंदवन ऑर्केस्ट्रा च्या दिव्यांग असलेल्या व्हीलचेअरवरून आर्केस्ट्राचे उत्कृष्ट मंच संचलन करणार्या व्हीलचेअर नृत्यांगन गायिका व मंच संचालिका शमा पठाणचा डॉ. गोविंद कासट मित्र मंडळ व संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सदस्यांनी सत्कार केला.क्षमा पठाण ही मुलगी 2013 मध्ये संधी निकेतन कार्यशाळेतून आनंदवणी आली. शिवणकला शिकली तेथे तीन वर्षे पूर्ण केल्यावर आनंदवनी काम करण्याची इच्छा तिने व्यक्त केली.




