अखेर निलकंठ लेआऊट मधील खडीकरणाचे कामास प्रारंभ

आम आदमी पार्टीच्या मागणीला यश

अमरावती /18 जानेवारी : प्रभाग क्र 9 वडाळी अंतर्गत निलकंठ लेआऊट येथील व्यवस्थित रस्ता नसल्याने पावसाळ्यात पाणी साचून राहत असे, त्या परीसरातील जमीन काळी असल्याने नागरिकांच्या दुचाकी घसर्‍याच्या व कोणत्याही नागरिकांना पडून दुखापत होऊ नये.
याकरिता आम आदमी पार्टी युवा आघाडीचे अध्यक्ष नागेश लोणारे यांच्या नेतृत्वात जून 2025 ला निलकंठ लेआऊट येथे रस्त्याचे खडीकरणाच्या संदर्भात मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे यांना निवेदन देण्यात आले होते. याच निवेदनाची दखल घेत निलकंठ लेआऊटमधील फुलबासा बोर्ड ते पंकज जाधव यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या खडीकरणाचे काम सुरू करण्यात आले. अतुल नागदेवते, रामेश्वर आडे, राहुल सोळंके, रामलाल जामूनकर, सुमेरसिंग राठोड, मनोहर चव्हाण, गजानन बोरकर, पंकज जाधव, राजेश मुरादे, दिनेश चव्हाण, मुकेश नांदूरकर, वैभव देशमुख, संदिप अभ्यंकर, वैभव देशमुख, रविंद्र मुन्ने, राहुल राठोड , अर्चना आडे, शोभा चव्हाण, किरण बोरकर, संगिता मुरादे, पायल खाडे, सिंधूताई चव्हाण, पुष्पा देशमुख आदींनी म.न.पा अमरावती तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

संबंधित बातम्या

Back to top button