मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी जाणून घेतले तपोवनचे कार्य

तपोवनला सविस्तर भेट देण्याचे मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी दिले आश्वासन

अमरावती /16 जानेवारी : अमरावती महानगरपालिकेच्या निवडणूक मतदान केंद्रावर दिव्यांगांना मतदानासाठी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेचे व्यवस्था व त्याला हिंदी झेंडे दाखवून शुभारंभ करण्यासाठी महानगर पालिकेच्या मनपा आयुक्त सौम्या शर्मा (चांडक) यांनी दि.15 जानेवारी ला आपल्या सहकार्यासोबत डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवनला सदिच्छा भेट दिली.
यावेळी मनपा आयुक्त सोबत अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, स्वीप नोडल अधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसदकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाठबागे सकाअ पंकज सपकाळ शाळा निरीक्षक योगेश पखाले सोमेश वानखडे कैलास कुलट उज्वल जाधव विशाल वालचाळे उपस्थित होते. याप्रसंगी आयुक्त सौम्य शर्मा यांनी डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या निवासस्थान असलेल्या शांतिकुंजला भेट देऊन त्यांच्या प्रतिमाचे दर्शन घेऊन पाहणी केली तसेच जीवन प्रदर्शनी मध्ये असलेल्या वस्तूंची पाहणी केली. यावेळी मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांचे स्वागत व माहिती तपोवनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी दिली तसेच तपोवन मध्ये सुरू असलेले उपक्रम पुनर्वसनाचे प्रयोग आणि प्रयत्न याबाबत डॉ. सुभाष गवई यांनी सविस्तर माहिती दिली व तपोवनच्या कार्याला प्रशासकीय स्तरावरून सहकार्य करण्याची विनंती केली. यावेळी आपल्या धावत्या भेटीतून आयुक्त सौम्य शर्मा यांनी पुन्हा तपोवनला भेट देण्याचे व संपूर्ण कार्य समजून घेण्याहे आश्वासन तपोवन अध्यक्ष डॉ. सुभाष गवई यांना दिले.

संबंधित बातम्या

Back to top button