दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी अ‍ॅम्ब्युलन्स सुविधाचे उदघाटन

घरापासून मतदान केंद्र पर्यंत पोचवून देण्याची महानगरपालिकेकडून व्यवस्था

अमरावती /15 जानेवारी : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 करीता प्रत्यक्ष मतदान दिनांक 15 जानेवारी, 2026 रोजी असून या निवडणुकीत अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागातील दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य नसल्यास, त्यांच्या सोयीसाठी म्ब्युलन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यावेळी तपोवन संस्थेत महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या अँब्युलन्स चे उदघाटन करण्यात आले.यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम, तपोवन संस्थेचे श्री सुभाष गवई, श्री डॉ. संदिप पाठबागे ,जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर ,शाळा निरीक्षक योगेश पखाले, पंकज सपकाळ, कैलास कुलट, उज्वल जाधव, सोमेश वानखडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. तपोवन संस्थेत राहणार्‍या दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही म्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यांना मतदानासाठी थेट मतदान केंद्रावर नेण्यात आले. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मतदारांनी खाली नमूद केलेल्या संपर्क अधिकार्‍यांशी थहरीींरिि द्वारे संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन अमरावती महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी आदल्या दिवशी संबंधीतांना सुचना द्यावयाचे असल्यास थहरीींरिि वर मॅसेज करावा. झोननिहाय मतदान केंद्र व संपर्क अधिकारी तपशील : झोन क्र. 1 – रामपुरी कॅम्प प्रभाग क्र. : 1, 2, 5, वाहन क्रमांक : चक 31 ऊड 0141, संपर्क अधिकारी : डॉ. पुजा देशमुख, मोबाईल क्रमांक : 7448239095, झोन क्र. 2 – नवीन तहसील कार्यालय, प्रभाग क्र. : 3, 4, 7, वाहन क्रमांक : चक 30 ङ 4140, संपर्क अधिकारी : डॉ. दिपिका वावगे, मोबाईल क्रमांक : 8766478897, झोन क्र. 3 – मनपा झोन कार्यालय, क्र. 2, राजापेठ, प्रभाग क्र. : 11, 12, 18, वाहन क्रमांक : ऊऊ 01 ॠ 9811, संपर्क अधिकारी : डॉ. प्रियंका हिवराळे, मोबाईल क्रमांक : 7721873749 , झोन क्र. 4 – मनपा झोन कार्यालय, क्र. 3, दस्तुरनगर, प्रभाग क्र. : 8, 9, 10, वाहन क्रमांक : चक 27 उ 5985, संपर्क अधिकारी : डॉ. संतोष तोटे, मोबाईल क्रमांक : 9326329768, झोन क्र. 5 – मनपा शिक्षण विभाग, अंबापेठ, प्रभाग क्र. : 6, 13, 17, वाहन क्रमांक : चक 31 उऊ 1381, संपर्क अधिकारी : डॉ. तुषार पोहणकर, मोबाईल क्रमांक : 9403422306, झोन क्र. 6 – जुने तहसील कार्यालय, प्रभाग क्र. : 14, 15, 16, वाहन क्रमांक : चक 27 उ 5794, अमरावती महानगरपालिकेने शहरातील सर्व पात्र दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button