युवा स्वाभिमान पार्टीच्या प्रचाराला गती

आ.रवि राणा यांच्या जनसंवाद व आशीर्वाद यात्रेने प्रभाग क्र. 12 मध्ये

अमरावती /12 जानेवारी : अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीने प्रचाराचा जोर वाढवला असून, प्रभाग क्र. 12 स्वामी विवेकानंद- बेलपुरा परिसरात आ. रवि राणा यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या जनसंवाद व आशीर्वाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या यात्रेमुळे प्रभागातील युवा स्वाभिमान पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले. कालीमाता मंदिर, कल्याण नगर चौक, कल्याण नगर नं. 1, मोती नगर चौक आदी भागांतून ही यात्रा मार्गस्थ झाली. ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत, ढोल-ताशांच्या गजरात यात्रेचे स्वागत केले. मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी सहभाग नोंदवत यात्रेला उत्साहात साथ दिली. या प्रभागात प्रीती हर्षल रेवणे (बनारसे)- बटन क्र. 06, श्री. संजय भगवान माहुरकर -बटन क्र. 11, सौ. अर्चना गणेश तालन- बटन क्र. 06 आणि श्री. निखील उर्फ छोटू आकोटकर-बटन क्र. 08 हे युवा स्वाभिमान पार्टीचे अधिकृत उमेदवार असून, ते सातत्याने मतदारांच्या संपर्कात राहून घराघरांत जाऊन संवाद साधत आहेत. नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे, विकासाची स्पष्ट भूमिका मांडणे आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडल्यामुळे मतदारांमध्ये या उमेदवारांबद्दल विश्वास वाढताना दिसत आहे. जनसंवाद यात्रेदरम्यान आ. रवि राणा यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, घरकुल योजना, महिला व युवकांसाठी रोजगार तसेच इतर मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी ठाम भूमिका मांडली.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button