नागपूर येथे वास्तू शिल्पकार प्रिया सुकलकर यांचा सत्कार

अमरावती /11 जानेवारी : तरुण वयातच अभ्यास, साधना आणि सृजनशीलतेच्या बळावर वास्तुशास्त्र व स्थापत्यकलेच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणार्या वास्तु शिल्पकार प्रिया सचिन सुकलकर यांचा कला गौरव संस्था, नागपूर तर्फे आयोजित दुसरे अक्षर साहित्य संमेलनात प्रेरणादायी मूल्याधिष्ठित आणि पर्यावरणपूरक असा स्थापत्यदृष्टिकोनाच्या विशेष सन्मानार्थ मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कथाकार वसंत वाहोकार, लेखक सुरेश पाचकवडे, प्रसिद्ध कादंबरीकार उर्मिला देवणे, कला गौरव संस्था अध्यक्ष संगीता बनाईत , अक्षय क्रांती फाउंडेशन अध्यक्ष शंकर घोरसे आदी विचार पिठावर उपस्थित होते. वास्तुशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून प्रिया सुकलकर यांनी ज्या वास्तुकलेकडे केवळ इमारती उभारण्याचा व्यवसाय म्हणून न पाहता त्या वास्तूमध्ये राहणार्या माणसाच्या सुखसोयी, मानसिक समाधान आणि निसर्गाशी सुसंवादी जीवनशैली यांचा सखोल विचार करणार्या, इमारतीच्या उभारणीत व अंतर्गत सजावटीत निसर्गाला हानी पोहोचवणार्या मटेरियलचा वापर टाळून पर्यावरणपूरक, टिकाऊ व संतुलित साधन सामग्रीची जाणीवपूर्वक निवड करणार्या, सौंदर्य, शाश्वतता आणि जबाबदारी यांचा सुरेख समतोल साधत कल्पनांना आकार देत. प्रेरणादायी, मूल्याधिष्ठित आणि पर्यावरणपूरक स्थापत्यदृष्टीकोन दिला या सन्मानार्थ आर्किटेक्ट प्रिया सचिन सुकलकर यांचा या मंचावर सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.




