दादागिरीची भाषा आम्हाला शिकवू नका

मुंबई/10 जानेवारी -: लोकांना वाटलं एकनाथ शिंदे येत नाही, गुलाबराव पाटील येत नाही. मात्र एकनाथ शिंदे यांना पण दाढी आणि गुलाबराव पाटलांना पण दाढी आहे. ते जरी आले नाही तर त्यांचा पट्टा अहिल्यानगरकरांना जागं करायला आला आहे असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. माझं राष्ट्रवादीवाल्यांना चॅलेंज आहे की, अहिल्यानगरची पाणीपुरवठा योजना कोणी मंजूर केली तर या पठ्याने मंजूर केल्याचे पाटील म्हणाले. पोरं तुम्ही पैदा करायचे आणि बारसं आम्ही करायचं हा धंदा आमचा नाही. अहिल्यानगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पाच वेळा या भागातून अनिल भैया राठोड आमदार झाल्याचे पाटील म्हणाले. आमच्याच मित्राने आमच्याशी लव्ह मॅरेज तोडलं, काल कोणीतरी बडबडले 50 खोके एकदम ओके. जर आम्ही उठाव केला नसता, मंत्री पदाला लाथ मारून आलो नसतो तर तुमची स्थिती काय झाली असती असे गुलाबराव पाटील म्हणाले. अहिल्यानगरचे पोलीस पिस्तोल घेऊन दादागिरी करतात. दादागिरीची भाषा आम्हाला शिकू नका तो धंदा आमचा आहे, आम्ही शंभर दिवस जगायला नाही तर दहा दिवस वाघासारखे जगायला आलो आहोत असे गुलाबराव पाटील म्हणाले. आम्ही असेच आमदार झालो नाही तर 302, 307 सर्व आम्हाला माहित आहे असे पाटील म्हणाले. ज्याच्यावर साधी केस नाही तो शिवसैनिक असू शकत नाही असेही ते म्हणाले.
इथे मजबूत आहे शिवसेनेचा बालेकिल्ला-महिलांना दीड हजार द्यायला लागले त्यावर टीका झाली. म्हणजे सोन्याचा चमच्या घेऊन जन्मलेल्यांना दीड हजाराची किंमत काय कळणार असा सवाल पाटील यांनी केला. या राज्यातील प्रत्येक महिलेला जात न पाहता 1500 रुपये दिल्याचे पाटील म्हणाले. तुम्ही कितीही करा हल्ला इथे मजबूत आहे शिवसेनेचा बालेकिल्ला. आमच्याशी युती करताना शेवटपर्यंत पप्पी घे पप्पी घे आणि आम्हाला लगेच सोडून दिल्याचे पाटील म्हणाले. त्यांना वाटलं शिवसेनेचं काहीच राहिलं नाही शिवसेना संपली आहे. पक्ष, संघटना संपू शकते मात्र विचार संपू शकत नाहीत, शिवसेना विचारावर चालणारी संघटना आहे.




