प्रेमजाळ्यात ओढून असहाय्य महिलेच लैंगिक शोषण

राजकीय दबावामुळे कारवाईस टाळाटाळ

* खा.अनिल बोंडे यांचा आरोप

अमरावती / 10 जानेवारी – जिल्ह्यातील घाटलाडकी ता. मोर्शि येथे दोन मुलांची आई असलेल्या एका असहाय्य महिलेचे शोषण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
तर या प्रकरणी आरोपीवर कारवाई होवू नये यासाठी एका बड्या प्रभावशाली व्यक्तीने हस्तक्षेप केला असल्याचा खळबळजनक आरोप खा.डॅा. अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेतून केला असून त्या आरोपीवर स्वतःच्या दोन निष्पाप लेकरांसह जीवन कंठणार्या एका असहाय्य महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार घाट लाडकी येथे उघडकीस आला आहे. या संपूर्ण प्रकरणाला कथित छुप्या धर्मांतराचे स्वरूप असल्याचा खळबळजनक आरोप राज्यसभा सदस्य खा. डॉ. अनिल बोंडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 2014 मध्ये विवाह झालेल्या या पीडितेचा संसार विस्कटल्यानंतर ती आपल्या दोन मुलींसह माहेरी मजुरी करून उदरनिर्वाह करत होती. 2019 मध्ये कामावर जात असताना मोहम्मद मुजम्मिल नावाच्या व्यक्तीने तिला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. यानंतर तिला शारीरिक आणि मानसिक छळाच्या चक्रात ढकलण्यात आले. पीडितेच्या मातोश्रींचे निधन झाल्यानंतर तर या छळाची सीमा ओलांडली गेली. मुजम्मिलच्या पत्नीने आणि मुलानेही तिला अतोनात त्रास देण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, तिला धर्म बदलण्यासाठी सातत्याने धमकावण्यात आले. पीडितेने जेव्हा न्यायासाठी पोलीस ठाणे गाठले, तेव्हा तेथील शेषराव कोसरे नावाच्या कर्मचार्याने तिची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी तिला हाकलून लावल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोकळे फिरत असून, त्यांना राजकीय अभय मिळत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. खा. डॉ. अनिल बोंडे यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत जिल्हा पोलीस अधीक्षकांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. आरोपींना त्वरित गजाआड करून पीडितेचे पुनर्वसन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून तिला सन्मानाने जगण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. समाजातील अशा प्रवृत्तींना वेळीच चाप न लावल्यास भविष्यात परिस्थिती अधिक भीषण होईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
पोलिसांची संशयास्पद भूमिका -या प्रकरणात पोलीस प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवर्यात सापडली आहे. पीडित महिला न्यायासाठी धावत असताना तिला मदत करण्याऐवजी पोलीस कर्मचार्याने अपमानित करून हुसकावून लावणे, हे कायद्याचे रक्षकच भक्षकांना साथ देत असल्याचे निदर्शक आहे. बड्या नेत्याच्या सांगण्यावरून कायदेशीर प्रक्रिया रोखली जात असल्याने संताप व्यक्त होत असून, सखोल चौकशीची मागणी होत आहे.

 

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button