भारतीय अंधजनतर्फे 10 अंध बांधवांनी केले रक्तदान

अमरावती /9 जानेवारी : भारतीय अंतजन विकास व पुनर्वसन संस्थेद्वारे शहरात एक अतिशय भरदयस्पर्शी असे धर्मादाय कॉटन फंड येथे विसा ओसवाल संघ माटुंगा मुंबईतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय अंधजनचे महासचिव शाकीर नायक यांच्या मार्गदर्शनामध्ये हे शिबिर पार पडले. रक्तदान समिती अमरावती चे महेंद्र भुतडा विसा संघ मुंबईतर्फे हरकचंद चेढा व मनीष प्रसाद तसेच अमरावतीचे विपुल गाला व सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन भाऊ गांग प्रदीप जैन हजर होते. रोहित राठी यांच्या मार्फत धर्मदाय हॉल निःशुल्क नेहमीप्रमाणे भारतीय अंधजनाला मिळाला तसेच यावेळी विसा संघाचे दर महिन्याचे राशन वाटप मध्ये 157 अंध परिवारांना राशन वाटप व तीनशे लोकांची स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
अनेक वर्षांपूर्वी शाकीर नायक अंध विद्यालयचा विद्यार्थी असताना व बी एफ बाहे सर त्यावेळी प्राचार्य असताना अंध विद्यालय रक्तदान समिती अध्यक्ष महेंद्र भुतडा व त्यांच्या चमूतर्फे स्व. जवाहरलाल दर्डा क्रीडामंत्री असताना डॉ. गोविंद कासट यांच्या संकल्पनेतून अंधांचे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. अंधांचे ते पहिले रक्तदान शिबिर असावे व डॉ. गोविंद कासट यांना अंधजनांच्या रक्तदानाचे जनक असे नामाभिमान करण्यात आले होते. त्यावेळी चार अंध व्यक्तीने रक्तदान केले होते व त्यातील एक किशोर साहू नावाचा अंध गृहस्थ जो पुढे अंध विद्यालयात शिक्षक झाला, पुढे त्याचे 25 रक्तदान झाले. 25 व्या रक्तदान प्रसंगी अंध किशोर साहू यांचा डॉ. रमेश गोडबोले रक्तपेढी संचालक सोपान गोडबोले रक्त वैद्यकीय प्रमुख डॉ. अनिल कवीमंडल व डॉ. गोविंद कासट यांच्या उपस्थितीत स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला होता.

संबंधित बातम्या

Back to top button