निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात
पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

अमरावती /8 जानेवारी : समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेल्या निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ एक दिवसीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गणेश कचकलवार राष्ट्रीय अध्यक्ष निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ, उद्घाटक म्हणून तानाजी जाधव टायगर ग्रुप अध्यक्ष, तसेच कॅप्टन परिमल फुलसुंगे, एस.पी. राठोड, प्रेममूर्ती नवनाथ लिमण, आंतरराष्ट्रीय कीर्तनकार, शिवव्याख्याते – ह .भ. प.यशवंत महाराज फाले, महाकाल भक्त उज्जेन, महंत डॉ.श्रीकांतदास धुमाळ महाराज (दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त), न्यू होम मिनिस्टर प्रस्तुत क्रांतीनाना मळेगावकर इत्यादी प्रमुख उपस्थितीत होते.
पत्रकार दिनानिमित्त प्रमुख पाहुण्यांनी सर्व पत्रकार बांधवास शुभेच्छा दिल्या, तर राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी पत्रकारांना शुभेच्छा देत आपल्या प्रमुख मागण्यासाठी मुंबई येथे येत्या काही दिवसात धडक मोर्चा राहील तसेच प्रत्येक पत्रकारांनी कुणालाही न घाबरता निर्भय पणे पत्रकारिता करावी, संघटनेतील पदाधिकारी व सदस्यांच्या काहीही समस्या असेल तर थेट मला कॉल करावा जेणेकरून त्या समस्येचे समाधान झाले पाहिजे आणि इथून पुढे निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेमार्फत सामाजिक संघ, माहिती अधिकार, पोलीस मित्र संघ व इतर संघमार्फत गाव तिथे शाखेचे नियोजन करून गोरगरीब जनतेच्या समस्यांचे तात्काळ निराकरण झालं पाहिजे व महाराष्ट्र बरोबरच संपूर्ण भारत भ्रष्टाचार मुक्त व्हावा यासाठी नक्कीच प्रयत्न करणार’, असे अध्यक्ष यांनी सांगितले.या एकदिवसीय अधिवेशनामध्ये, कॅप्टन परिमल फुलसुंगे , एस.पी. राठोड , प्रेममूर्ती नवनाथ लिमण, प्रताप निंबाळकर, अक्षय राजीव शहरकर, , शिवा पासलकर , श्रुती वैभव कढणे, आरती जिाधव , गजानन , अर्चना धुरदेव , अजित निंबाळक (उद्योजक), समीर इंदलकर (गडकिल्ले संरक्षक),(भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन स्टाफ), कु. सह्याद्री क्रांतीनाना मळेगांवकर सेलिब्रिटी (संगीत), विजयजी मोरे (उद्योजक), राजेश दिवटे , ह .भ. प. यशवंत महाराज फाले, उमेश लोंढे, डॉ.राजु पांचाळ दिग्दर्शक, लेखक – अल्ताफ शेख, शिवाजी फुलचंद मुसळे, माणिक देवकर, कुमार कबीर शशि कंधारे, आरुष श्रीपाद तसेच पत्रकार दिनी निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ परिवारातील अमोल कोमावार, लक्ष्मण टेकाळे, विजय सूर्यवंशी, पुरुषोत्तम कुडवे, विनोद कनाके, प्रफुल नान्ने, कुलदीप सुरोशे, अवंतिका म्हात्रे, सुनील सूर्यवंशी, उत्तम ब्राह्मणवाडे, विजय काळे, गजानन काळे, संगमेश्वर कांबळे, आनंदराव शिनगारे, कुसुम पारटकर, माधुरी पिंगळे, सुलोचना जाधव आदि सन्मानित करण्यात आले.




