आ.रवि राणा यांच्या हस्ते मुख्य प्रचार कार्यालयाचे थाटामाटात उद्घाटन

स्वामी विवेकानंद-बेलपुरा येथे युवा स्वाभिमान पार्टीच्या प्रचाराला सुरुवात

अमरावती /7 जानेवारी : अमरावती महानगरपालिका प्रभाग क्र. 12 स्वामी विवेकानंद-बेलपुरा येथे युवा स्वाभिमान पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार रवि राणा यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटामाटात पार पडले. या निमित्ताने आयोजित जाहीर सभा व भव्य पदयात्रेमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. युवा स्वाभिमान पार्टीकडून या प्रभागात संजय माहुरकर, प्रिती हर्षल रेवणे (बनारसे), निखिल उर्फ छोटू आकोटकर व अर्चना तालन या सुशिक्षित व युवा उमेदवारांना संधी देण्यात आली असून, त्यांच्या प्रचारासाठी हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. सुशिक्षित व तरुण उमेदवारांमुळे प्रभागाचा होणार कायापालट- आ. रवि राणा उद्घाटनानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना आमदार रवि राणा म्हणाले, युवा स्वाभिमान पार्टीने प्रभाग क्र. 12 मध्ये सुशिक्षित, तरुण व विकासाभिमुख उमेदवार दिले आहेत. हे उमेदवार प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, संजय माहुरकर-बटन क्र. 11, प्रिती हर्षल रेवणे (बनारसे)- बटन क्र. 06, अर्चना तालन- बटन क्र. 06, निखिल उर्फ छोटू आकोटकर – बटन क्र. 08 या उमेदवारांना ‘पाना’ चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. अमरावतीच्या विकासाचा अनुभव प्रभागातही उतरवणार जयघोष, औक्षण व आतषबाजीत उत्स्फूर्त स्वागत या कार्यक्रमानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. युवा स्वाभिमान पार्टीचा विजय असो, आ. रवि राणा आगे बढो, अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण स्वामी विवेकानंद-बेलपुरा परिसर दुमदुमून गेला. महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून, फुलांचा वर्षाव केला तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत आमदार रवि राणा व उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी फेटे बांधून, हार घालून स्वागत करत पक्षावरील विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमास युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी, स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. एकूणच या भव्य कार्यक्रमामुळे प्रभाग क्र. 12 मध्ये युवा स्वाभिमान पार्टीच्या प्रचाराला जोरदार प्रारंभ झाला असून, येणार्‍या महानगरपालिका निवडणुकीत ‘पाना’ चिन्हाला मोठे यश मिळेल, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button