पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीयस्तरीय हॅकाथॉन-26 स्पर्धेचे आयोजन
स्पर्धेत मिळणार दोन लाखांचे पारितोषिक

* देशभरातून विद्यार्थी होणार सहभागी
अमरावती /7 जानेवारी : पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय अमरावती येथे टेकलॉन्स 2026 अंतर्गत राष्ट्रीयस्तरीय हॅकाथॉन-26 या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भातील सर्वात मोठ्या विद्यार्थी-केंद्रित हॅकाथॉनपैकी एक म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात असून, तंत्रज्ञान आणि उद्योगाभिमुख समस्या सोडविण्यासाठी हे एक प्रभावी राष्ट्रीय व्यासपीठ ठरणार आहे.
हॅकाथॉन-26 हा आठ तासांचा कोडिंग मॅरेथॉन असून, यासाठी 2 लाखांचे भव्य बक्षीस विद्यार्थ्यांना या स्पर्धेत मिळणार आहे. यामध्ये विजेत्या संघासाठी 1 लाख रुपये बक्षीस आणि पाच समस्या-विषयक प्रत्येकी वीस हजार रुपये बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धे साठी विविध समस्येकरिता तीनशे हुन अधिक संघानी आपले सोल्युशन सादर केले असून ज्यात अंतिम फेरीसाठी निवडलेल्या 50 संघांमध्ये देशभरातील नामांकित विविध अभियांत्रिकी संस्थांमधील 250 हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. हॅकाथॉन-26 उद्घाटन पर्सिस्टंट सिस्टिम्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आनंद देशपांडे साहेब यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स / मशीन लर्निंग इन हेल्थकेअर, जनरेटिव्ह आर्टिफिशिअल इंटेलिजन्स इन सप्लाय चेन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स फॉर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, इंडस्ट्री 5.0 आणि ओपन इनोव्हेशन यांसारख्या भविष्योन्मुख समस्या विधानांवर काम केले जाणार आहे. या हॅकाथॉन स्पर्धेची अंतिम फेरी महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद ऑडिटोरिअम मध्ये 19 जानेवारी 2026 रोजी, सकाळी 8 वाजता सुरु होणार सतत आठ तास विद्यार्थी समस्येसाठी प्रोग्रामिंग करणार आहे.




