मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची सखोल पाहणी
ई.व्ही.एम. गोदामाची निवडणूक अधिकारी तथा

अमरावती /5 जानेवारी : निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज सोमवार, दि. 05 जानेवारी 2026 रोजी अमरावती येथील सांस्कृतिक भवन परिसरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (एतच्) गोदामाची सविस्तर पाहणी केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ई.व्ही.एम. यंत्रांच्या साठवणूक, सुरक्षा व व्यवस्थापनाबाबत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्याच्या उद्देशाने ही पाहणी करण्यात आली.
यावेळी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी ई.व्ही.एम. साठवणूक व व्यवस्थापन केंद्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धती पाहून संबंधित अधिकार्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. ई.व्ही.एम. मशीनची सुरक्षित साठवणूक, नोंदणी, देखभाल, तांत्रिक तपासणी तसेच गोदामातील सुरक्षा व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. गोदामातील सीसीटीव्ही व्यवस्था, प्रवेश नियंत्रण, रजिस्टर व कागदपत्रांची पडताळणी याबाबतही त्यांनी सूचना केल्या. ई.व्ही.एम. संदर्भातील सर्व कामकाज हे मा. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोरपणे व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले. सदर कामासाठी योग्य नियोजन करून वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने काम पूर्ण करण्यावर भर देण्यास त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी दक्षता घेऊन कामाची गती वाढविण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या. निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा कणा असून त्यामध्ये ई.व्ही.एम. यंत्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे यंत्रांची सुरक्षितता व व्यवस्थापन याबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले. अमरावती महानगरपालिका निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार नगरपालिका निवडणूकीतील आतापर्यंत 1200 कंट्रोल युनिट व 2400 बॅलेट युनिट प्राप्त झाले आहे. सदर ई.व्ही.एम. मशीन मध्य प्रदेश मधून प्राप्त झाले आहे. आज सांस्कृतिक भवन येथून निवडणूक झोन कार्यालयात ई.व्ही.एम. मशीन देण्यात आल्या आहे. मा. आयुक्त महोदयांनी संवेदनशील भागासाठी मायक्रो ऑब्झर्वर यांची नियुक्ती केलेली आहे. या पाहणीदरम्यान संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच ई.व्ही. एम. व्यवस्थापनाशी निगडीत कर्मचारी उपस्थित होते.




