माळी समाज परिचय संमेलनात अॅड.प्रभाकर वानखडे सन्मानित
अ.भा.ग्राहक कल्याण परिषदेत राज्य सचिव पदावर नियुक्ती बद्दल सत्कार

अमरावती /3 जानेवारी : येथील बहूआयामी व्यक्तिमत्व, समाज सेवक साहित्यिक, लेखक, जेष्ठ पत्रकार ऍड. प्रभाकर वानखडे यांची अ. भा. ग्राहक कल्याण परिषदेच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदावर नियुक्ती झाल्या बद्दल त्यांना राज्यस्तरीय माळी समाज परिचय संमेलनात नुकतेच शाल, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र पुष्पगुष्य देऊन संमेलनाचे उदघाट्क तथा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणकाका आखाडे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
स्थानिक मुधोळकर पेठ मधील माळी बोर्डिंग मधील सभागृहात नुकतेच सर्व शाखिय माळी समाजाचे युवक युवती परिचय संमेलन पार पडले याप्रसंगी, ज्योती पिठावर स्वागताध्यक्ष गणेश काटवले, संमेलन अध्यक्ष सागरभाऊ बनकर, विशेष पांडुरंग कोठाळे, प्रवीण वाघमारे, सावता परिषदचे सह प्रदेश प्रवक्ता नाना आमले, जिल्हाध्यक्ष ऍड. श्रीकांत नागरिकर,राजेश पोहकर, माळी मिशनचे इंजि. वासुदेव चौधरी, गोविंद भुसारी, शारदाताई कोथिंबीरे, मंजुषा महाजन, आकाश वाघमारे,शेखर माळोदे, श्रीधर देशमुख, अजय राऊत, निलेश नागपूरे आदी मान्यवर उपस्थित होते.




