पीडीएमसी येथील इमर्जन्सी मेडिसिन विभागाकडून सीपीआर मॅनिकिन्सचे दान

अमरावती /4 जानेवारी : श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथे इमर्जन्सी मेडिसिन विभागाने कमी खर्चात अनेक उचए कार्यक्रम आयोजित करून तयार झालेल्या निधीतून दोन प्रौढ आणि दोन बाल सीपीआर मॅनिकिन्सची खरेदी केली. सीपीआर मॅनिकिन ही एक वास्तववादी, मानवी आकाराची प्रशिक्षण डमी आहे जी सुरक्षित, नियंत्रित वातावरणात कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) आणि इतर जीवनरक्षक कौशल्ये जसे की वायुमार्ग व्यवस्थापन शिकवण्यासाठी आणि सराव करण्यासाठी वापरली जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना जिवंत व्यक्तीला धोका न देता योग्य कॉम्प्रेशन खोली, गती आणि बचाव श्वासांसाठी स्नायू स्मृती विकसित करण्यास अनुमती मिळते, आधुनिक आवृत्त्या कामगिरीवर त्वरित अभिप्राय देतात. हे मॅनिकिन्स प्रशिक्षणासाठी पीडीएमसीला दान करण्यात आली. या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी देशमुख व अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख यांनी या टीमचे अभिनंदन केले आहे. उझठ फॉर ऑल हा आरोग्य क्षेत्रात एक चळवळ झाली पाहिजे, असे इमर्जन्सी मेडिसिनचे प्रभारी डॉ. सुदेश दारव्हेकर यांनी सांगितले. डॉ. पी. आर. सोमवंशी व डॉ. स्वप्नील पाटील यांनी जीव वाचवण्यासाठी उझठ प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.




