शकुंतला रेल्वेचा 112 वा वाढदिवस अत्यंत उत्साहात

परतवाडा /2 जानेवारी – शकुंतला रेल्वे बचाव समितीच्यावतीने ऐतिहासिक शकुंतला रेल्वेचा 112 वा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास समितीचे सर्व सत्याग्रही, रेल्वेप्रेमी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात शकुंतला रेल्वेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी उप स्थितांनी शकुंतला रेल्वेचा गौरव शाली इतिहास, विदर्भातील सामाजिक-आर्थिक विकासात दिलेले योगदान तसेच सामान्य नागरिकांच्या जीवनाशी असलेले तिचे नाते यावर आपले विचार व्यक्त केले.शकुंतला रेल्वे ही केवळ वाहतुकीचे साधन नसून विदर्भाच्या अस्मितेचे प्रतीक असून तिचे पुनरुज्जीवन होणे काळाची गरज असल्याचे मत यावेळी सत्याग्रह्निनी व्यक्त केले. रेल्वे सुरू करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दिशा अधिक तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी शकुंतला रेल्वे जिवंत झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. एकतेचा आणि संघर्षाचा संदेश देत हा वाढदिवस सोहळा उत्साहात संपन्न झाला.

संबंधित बातम्या

Back to top button