धर्म परिवर्तन प्रकरणातील 8 आरोपींना न्यायालयाची जमानत

वरुड तालुक्यातील शिंगोरी येथील प्रकरण

अमरावती /1 जानेवारी – वरुड तालुक्यातील बेनोडा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या शिंगोरी गावात गत मंगळवारी धर्म परिवर्तनाच्या तक्रारीवर पोलिसांनी त्वरित कारवाई करत रितेश बोंद्रे व चार महिलांसह एकूण आठ आरोपींना अटक केली. आरोपींमध्ये नागपूरचे आनंदकुमार बेंजामिन करी, केरळचे सुधीर विलियम जॉन विलियम, कलमेश्वरचे विक्रम गोपाल सांडे आणि चार महिला यांचा समावेश होता. ही कारवाई ग्रामीण अपराध शाखेने केली.
तक्रारीनुसार, रितेश बोंद्रेंच्या घरी 5-6 अज्ञात लोक आले होते. घरासमोर मंडप उभारण्यात आले आणि एक व्यक्ती पांढर्‍या कपड्यात येऊन लोकांना ख्रिस्ती धर्माविषयी माहिती देत होता. त्याने पैशांच्या प्रलोभनाने धर्म परिवर्तन करण्यास लोकांना प्रोत्साहित केले. पोलिसांनी कलम 299 व 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आणि चौकशीत रितेशने इतर आरोपींची नावे सांगितली. या घटनेची माहिती केरळ सरकारला मिळाल्याने मुख्यमंत्री यांनी अटकेचा निषेध केला आहे. न्यायालयाची कारवाई आणि सामाजिक प्रतिक्रिया- आरोपींना न्यायालय समोर हजर केले असता, वरूड न्यायालयाने त्यांना वैयक्तिक हमीवर जमानत मंजूर केली. या कारवाईमुळे शिंगोरीसह परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी स्थानिकांशी संवाद साधून अफवा पसरवू नये व शांतता राखावी असे सांगितले.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button