बडनेरा परिसरात चायनीज मांजा व प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात महानगरपालिकेची धडक कारवाई

7 हजार दंड वसूल

अमरावती /1 जानेवारी : महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहायक आयुक्त झोन क्र. 4 यांच्या निर्देशानुसार आज दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी झोन क्र. 4, बडनेरा अंतर्गत येणार्‍या जुनीवस्ती, बडनेरा परिसरात पतंग विक्री करणार्‍या आस्थापनांवर चायनीज मांजा तपासणी, प्रतिबंधित प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान एकूण 20 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये बहुतांश आस्थापनांमध्ये कापडी, कागदी पिशव्या तसेच 51 मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले. तसेच 5 पतंग विक्री करणार्‍या आस्थापनांची तपासणी करण्यात आली असता, कुठेही चायनीज मांजा विक्री होत असल्याचे आढळले नाही. संबंधित आस्थापनांमध्ये साधा धागा, पतंग व चरखा विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. मात्र काही आस्थापनांमध्ये कचरा इतरत्र फेकणे व प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आढळून आल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानुसार खालीलप्रमाणे दंड आकारण्यात आला – कल्पना किराणा स्टोअर्स – 1,000/- श्री गणेश किराणा स्टोअर्स – 1,000/- साई दूध डेअरी – 5,000/- अशा प्रकारे एकूण 7,000/- (रुपये सात हजार) इतका दंड वसूल करण्यात आला. सदर मोहिमेत प्लास्टिक निर्मूलन नोडल अधिकारी विनोद टांक, वरिष्ठ स्वास्थ निरीक्षक शारदा गुल्हाने, स्वास्थ निरीक्षक सचिन सैनी, सोपान माहुलकर, मेघराज ढेणवाल व सावरकर हे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button