मनपाच्या 22 प्रभागांत उमेदवारांची जोरदार स्पर्धा

अमरावती /29 डिसेंबर – येत्या मनपा निवडणुकीसाठी शहरातील 22 प्रभागांमध्ये राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यंदाच्या लढतीत भाजप, काँग्रेस, बसपा, शिवसेना (उबाठा) आणि राकांपा (अजित पवार गट) यांचे उमेदवार आपापल्या ताकदीसह मैदानात उतरले आहेत.
ज्यामुळे शहरातील मतदारांसमोर प्रचंड स्पर्धा दिसून येणार आहे.राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, या निवडणुकीत अनुभव, युवकांची ऊर्जा आणि स्थानिक ओळख हे तिन्ही घटक निर्णायक ठरणार आहेत. मतदार उमेदवाराची निवड करताना या बाबींचा विशेष विचार करतील, त्यामुळे पक्षांनी यंदा आपल्या उमेदवारांची निवड काळजीपूर्वक केली आहे.
भाजपने विविध प्रभागांत अनुभवी उमेदवारांना संधी दिली
शेगाव-रहाटगाव: धीरज बारबुद्धे आणि सविता ठाकरे यांनी आपली ताकद दाखवली तर वंदना मडघे आणि विजय ठाकरे या युवा उमेदवारांची उपस्थिती देखील ठळक आहे.
संत गाडगेबाबा-पीडीएमसी: सुरेखा लुंगारे व चंदू बोमरे यांसह स्वाती निस्ताने आणि विनाद तनवाईस मैदानात आहेत.
नवसारी: ऋषिकेश देशमुख, शाम पाध्ये आणि जयश्री कुबडे यांसह रिता मोकलकर, संजीव कथीलकर यांचा समावेश अनुभव व स्थानिक ओळखीने भरलेला आहे.
महेंद्र कॉलोनी-नया कॉटन मार्केट: धीरज हिवसे, मनोज डवरे, माधुरी ठाकरे, मेघा काले यांसह संजय वारे, जयश्री जठाले आणि आशीष ठाकरे मैदानात आहेत.
विलास नगर-मोरबाग: कौशिक अग्रवाल, राजेश साहू (पड्डा), दीपक साहू (सम्राट) यांसह कुसूमताई साहू व संजय नरवणे यांची झुंबड लढत दिसून येईल. जवाहर स्टेडियम: श्रीचंद तेजवानी, विवेक चुटके आणि शोभना देशमुख मैदानात असून सोनाली यांचा समावेश युवा उमेदवार म्हणून महत्त्वाचा आहे.
जोग स्टेडियम-चपराशीपुरा: शैलेंद्र भाग, प्रकाश घाटे, शीतल वाघमारे यांसह मीना ज्योती, सुनीता आठवले, विजया नाखले यांची उपस्थिती दर्शवते.
एसआरपीएफ-वडाली: सरला गडलिंग, शिवदास गायकवाड, अर्चना कांबे यांसह संजय तायडे आणि पंचफुला पक्ष मैदानात आहेत.
बेनोडा-भीमटेकडी-दस्तुर नगर: दीपक गिरोलकर, रमेश टेंबरे, शिल्पा पाचघरे आणि तनवी तायडे यांच्यासह दीपक उत्तराधी, छोटू पाटील, संध्याताई टिकले यांनी उमेदवारी नोंदवली.
रुक्मिणी नगर-फ्रेजरपुरा: अलका सरदार, शैलेश राऊत, नूतन भुजाडे व माया कांबले यांचा समावेश आहे.
स्वामी विवेकानंद श्रेणी: राधा राजू कुरील, प्रदीप उर्फ बंडू हिवसे, योजना राजेंद्र मेटे, मेघा हरणे यांची उपस्थिती महत्त्वाची ठरली आहे.
अंबापेठ गौरक्षण: प्रणित सोनी, स्वाती कुलकर्णी, पानट आणि लवलिना हर्षे यांचे नाव पुढे आले आहे.
जवाहर गेट बुधवारा: विवेक कलोती आणि गंगा खारकर मैदानात आहेत.
गडगडेश्वर: आशीष अतकरे, सचिन रासने, सुनील सावरकर यांसह मृणाली चौधरी, अर्पिता गाजे व दीपक पोहेकर यांची उपस्थिती महत्त्वाची आहे.
राजापेठ: चेतन पवार, राजेश शादी व पद्मजा कौंडण्य.
साईनगर: तुषार भारतीय, चेतन गावंडे, रेखा भूतडा यांसह ज्योती वैद्य व लता देशमुख मैदानात आहेत.
सुतगिरणी: सुनील काळे, मंगेश खोंडे, वंदना हरणे, भारती गुहे यांची झुंबड लढत आहे.
जूनी बस्ती-बडनेरा: छाया अंबाडकर, गंगा अंभोरे व गौरव बानते यांसह अंकेश गुजर व विकास सुने मैदानात आहेत.
नवी बस्ती-बडनेरा: किशोर जाधव, संजय कटारिया, नरेश धामाई व बरखा शर्मा यांसह उज्वला कालबांडे, डॉ. वीरेंद्र ढोबले यांचा समावेश ठळक आहे.
काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची नावे
शेगाव-रहाटगाव: प्रतिभा विजय वनखडे, अर्चना इंगोले आणि मुकेश गिरी यांची उपस्थिती महत्त्वाची.
संत गाडगेबाबा-पीडीएमसी: बालासाहेब भुयार, चित्रा कुलट आणि नम्रता पावडे मैदानात आहेत.
नवसारी: प्रशांत महल्ले, स्वाती जावरे व लुबना तनवीर मुन्ना नवाब यांचा समावेश अनुभव व युवा ओळखीने भरलेला आहे.
महेंद्र कॉलोनी: डॉ. दिव्या सिसोदे, अशोक रेवस्कर, विजय बर्वे आणि गोलू मानकर यांसह राजेश चावरे, रवि रायबोले व संजय भोवते यांची ताकद जाणवते.
जवाहर स्टेडियम: डॉ. शिल्पा हासनी, अविनाश भडांगे व रोहण चिमोटे मैदानात आहेत.
गडगडेश्वर: संगीता जितेंद्र वाघ, पवन राऊत, खुशी बेले यांसह सचिन वाटकर मैदानात आहेत.
नवी बस्ती: डॉ. कांचन बलिराम ग्रेसपुंजे, संजय बोबडे यांची उपस्थिती महत्त्वाची ठरली आहे.
बसपाच्या उमेदवारांची यादी
शेगाव-रहाटगाव: करुणा शेंडे, आनंदा जोडणे व मनोज इंगळे
संत गाडगेबाबा-पीडीएमसी: विनय पहाडन, मनीष इंगले
विलास नगर-मोरबाग: अजहर अली नूर अली, संगीता भांबूरकर व चंदुमनी डोंगरे
जोग स्टेडियम: जागृति वानखडे, पद्मा जंगम, आशिया शहा व रावसाहेब गोंडाणे
एसआरपीएफ-वडाली: दीपक पाटील, सूरज गवई, नीला भालेकर व सविता उईके
बेनोडा-भीमटेकडी-दस्तुर नगर: अजय गोंडाणे, विजय घोंगडे व गौरव खोंड
रुक्मिणी नगर: अश्विनी लोखंडे, निर्मला बोरकर, शीतल गोंडाणे, सचिन सहारण, सचिन वैद्य यांचा समावेश महत्त्वाचा आहे.
नवी बस्ती: माया मेश्राम, अश्विनी कंठाने, प्रज्ञा खोब्रागडे, देविका मेश्राम, सविता जोशी, अब्दुल मजीद शेख यांची नावे
शिवसेना (उबाठा) – प्रभागवार उमेदवार
प्रभाग क्र. 2 – संत गाडगेबाबा, पीडीएमसी: बालकृष्ण आढाऊ, प्रभाग क्र. 3 – नवसारी: प्रदीप विष्णुपंत बाजड, वैशाली आशिष विधाते, प्रविना सीताराम आठवले, प्रभाग क्र. 4 – जमील कॉलनी, लालखडी: फरजान परवीन सय्यद शकील, प्रभाग क्र. 6 – विलास नगर, मोरबाग: पंजाबराव तायवाडे, प्रभाग क्र. 8 – जोग स्टेडियम, चपराशिपुरा: अजय जयसिंग भिलावेकर, प्रभाग क्र. 10 – बेनोडा, भिमटेकडी: शारदा संजय गोंडाने
प्रभाग क्र. 11 – फ्रेजरपुरा, रुख्मिणी नगर: विजय किसनाल मंडले, प्रभाग क्र. 12 – स्वामी विवेकानंद कॉलनी, बेलपुरा: जयश्री देवराव कुर्हेकर
प्रभाग क्र. 13 – अंबापेठ, गोरक्षण: पूनम पियूष धोटे, प्रभाग क्र. 14 – जवाहर गेट, बुधवारा: प्रविण वसंतराव हरमकर, विशाखा प्रवीण हरमकर
प्रभाग क्र. 17 – गडगडेश्वर: सुषमा रविकांत काकडे, प्रभाग क्र. 20 – सूतगिरणी: संजय नामदेवराव शेटे, संजय रामकृष्ण गव्हाले, कोकिळा रामकृष्ण सोलंके, प्रभाग क्र. 21 – जूनी वस्ती बडनेरा: संगीता सुखलाल कैथवास, प्रभाग क्र. 22 – नवीवस्ती बडनेरा: अर्चना बंडू धामणे, चैतन्य विकास काले
राकांपा (अजित पवार) गटातील इच्छुक उमेदवारांची नावे
प्रभाग क्र. 1 – शेगाव-रहाटगाव: गुड्डू धर्माले, मेघा रत्नदीप बागडे, चंदुभाऊ खेडकर, ऋतुराज राऊत पत्नी, प्रभाग क्र. 2 – पीडीएमसी: मीनल योगेश सवाई, प्रमोद महल्ले, जयश्री मोहन क्षीरसागर, रवि वनखडे, प्रभाग क्र. 3 – नवसारी: प्रशांत डवरे, प्रिया प्रमोद धनाडे, संकेत दिलीप महल्ले, परवीन बानो मोहम्मद फारुख, प्रभाग क्र. 4 – जमील कॉलनी, लालखडी: शेख जुबैर शेख जब्बार, फौजिया तहसीन नदीम, अ. नफीस पहेलवान, नाजिया परवीन जाकी मुल्ला, प्रभाग क्र. 5 – महेंद्र कॉलनी: बंडू निंभोरकर, सारिका नीलेश वडे, मोरे पत्नी, पारडे, प्रभाग क्र. 6 – विलास नगर, मोरबाग: रीना प्रवीण भोरे, सरोज सुगनचंद गुप्ता, प्रभाग क्र. 7 – जवाहर स्टेडियम: भूषण बनसोड, मनीष बजाज, अंजली प्रवीण महल्ले, प्रभाग क्र. 9 – वडाली, एसआरपीएफ: ममता संदीप आवारे, विजय बाभुलकर, पवार, प्रभाग क्र. 10 – बेनोडा, भीमटेकडी, दस्तुर नगर: अविनाश मार्डीकर, मंगेश मनोहरे, अर्चना मनीष पाटील, सुजाता राजेश जवंजाल, प्रभाग क्र. 11 – रुख्मिणी नगर, फ्रेजरपुरा: किशोर भुयार, सुजाता बोबडे, एड. किशोर शेळके, जुम्मा नंदावाले, प्रभाग क्र. 12 – स्वामी विवेकानंद: अर्चना किशोर भुयार, गणेश तंबोले, प्रभाग क्र. 13 – अंबापेठ, गौरक्षण: रतन पहेलवान, डॅडी देशमुख, रश्मी नावंदर, प्रभाग क्र. 15 – छायानगर, गवलीपुरा: शेख जफर शेख जब्बार, सिराज मेमन सुलेमान मेमन, नसीम सुलताना मो. शारिक, शाहेदाबानो मो. अय्यूब, प्रभाग क्र. 16 – अलीम नगर, रहमत नगर: डॉ. अतुफा हुमा हाफिक, अब्दुल सत्ता राराणी, अहमद खान पत्रकार
प्रभाग क्र. 17 – गडगडेश्वर: प्रा. अजय बोंडे, सरोज गोपाल चिखलकर, नलिनी आशीष कपिले, प्रभाग क्र. 18 – राजापेठ, श्री संत कंवरराम: अभिषेक हजारे, एड. प्रणाक्षी मयूर झांबानी, वैशाली सतीश ढेपे, प्रभाग क्र. 19 – साईनगर: रीना नंदा, प्रभाग क्र. 20 – सूतगिरणी: मामा मडवकर, प्रभाग क्र. 22 – नवी वस्ती बडनेरा: इशरत बानो मन्नान खान, अकरम अली.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button