महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना, अमरावतीतर्फे दिनदर्शिकाचे भव्य अनावरण

मान्यवरांनी केले मार्गदर्शन

अमरावती/29 डिसेंबर – महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना, मुंबई-32, जिल्हा शाखा अमरावती यांच्यावतीने 28 डिसेंबर 2025 रोजी संघटनेच्या दिनदर्शिका 2026 चे भव्य अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमासाठी शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई संघटनेचे राज्याध्यक्ष रवींद्र लोटन पाटील व माजी राज्य सचिव परमेश्वर बाबर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष राजेंद्र दिक्षित, जिल्हा सचिव किशोर मालोकार व महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना, मुंबई-32, जिल्हा शाखा अमरावती यांच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदीप बोडके, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती अमरावती हे होते. प्रमुख उपस्थितींमध्ये प्रवीण खांडेकर व अजित पाटील (शिक्षण विस्तार अधिकारी), विजयाताई झाडे, अनिल डाखोरे व मोहन जाधव, संजय कोकाटे यांचा समावेश होता. प्रास्ताविकात जिल्हा सचिव किशोर मालोकार यांनी संघटनेच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेत दिव्यांग कर्मचार्‍यांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मोहन जाधव यांनी आपल्या भाषणातून संघटनेच्या कार्याची प्रशंसा करत, अपंग कर्मचार्‍यांच्या हक्कांसाठी संघटना करत असलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघटनेच्या उपाध्यक्ष सौ. शालिनीताई बोरखडे यांनी प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजू डांगे यांनी केले. सदर कार्यक्रमास संघटनेचे सचिन इंगोले नितीन गायकी युवराज थोरात प्रशांत मुंद्रे,परिचित बाराहाते, संतोष चव्हाण ,सौ वनिशा घुबडे ,शुभांगी देशमुख , हिरालाल रावत , नाजीम अली कीफायत अली जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे दिव्यांग कर्मचार्‍यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

संबंधित बातम्या

Back to top button