शेगाव नगरीत अटल यात्रा सायकल वारीचे जल्लोषात स्वागत

अटलजी अमर रहेच्या घोषणेने शेगाव नगरी दुमदुमली

अमरावती /28 डिसेंबर : संत श्री गजानन महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचा जयघोष करीत अमरावती येथून निघालेली अटल यात्रा सायकल वारी शेगाव नगरीत पोहोचताच या रॅलीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शेगाव येथे अटल यात्रा काढण्यात आली. आणि या अटल यात्रेचा समारोप संत श्री गजानन महाराज मंदिर परिसरात करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी सर्व भाविक भक्तांना माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रप्रेम, पक्षनिष्ठा व देशभक्तीचा अथांग सागर असलेल्या अटलजी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. आणि अमरावती ते शेगाव प्रवासादरम्यान गजानन भक्तांनी तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले, अशा सर्वांचे आभार मानले. त्यानंतर अटल यात्रा सायकल वारीमध्ये आलेल्या सर्व गजानन भक्तांनी संत श्री गजानन महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

संबंधित बातम्या

Back to top button