44 वी विदर्भ राज्यस्तरीय महिला व पुरुष शूटिंग बॉल अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप
श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या अंतर्गत

* अनेकांनी घेतला सहभाग
* विजेत्यांचा पुरस्कार देवून सन्मान
अमरावती /26 डिसेंबर : शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाध्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127 व्या जयंतीउत्सव निमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय अंतर्गत 44 वी विदर्भ राज्यस्तरीय सीनियर महिला व पुरुष शूटिंग बॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन गुरुवार दिनांक 25 डिसेंबर रोजी श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती, येथे करण्यात आले होते सदर स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रांगणामध्ये संपन्न झाले त्यानंतर 44 वी विदर्भ राज्यस्तरीय सीनियर महिला व पुरुष शूटिंग बॉल अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात व खेळाडूंच्या उत्कृष्ट प्रतिसादात पार पडली. स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी समारंभाध्यक्ष मा.श्री. हेमंतराव काळमेघ कार्यकारणी सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती प्रमुख अतिथी मा. शकिलोद्दील काझी सचिव, अमॅच्युअर शुटींगबॉल असोसिएन विदर्भ प्रदेश मा. प्रदीप शेट्टीये मा. जिल्हा क्रीडा अधिकारी, वाशिम श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ. सुभाष गावंडे सचिव आयोजन समिती मान्यवर उपस्थितीत होते
सदर कार्यक्रमाच्याप्रसंगी स्पर्धा कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्वप्रथम डॉ. पंजाबराव उपाध्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला हारर्पण करण्यात आले लगेचच त्यानंतर सन्माननीय मान्यवरांचे सन्मानचिन्ह शाल श्रीफळ व फुलझाड देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर समारंभाध्यक्ष मा.श्री. हेमंतराव काळमेघ यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना भाऊसाहेबांचे स्वप्न काय होते याविषयीचे याप्रसंगी उपस्थितांना माहिती देताना त्यांनी याप्रसंगी असे सांगितले की भाऊ साहेबांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करण्याच्या अगोदर भाऊसाहेबांनी शिवाजी व्यायाम शाळेची स्थापना केली होती त्या मागचा त्यांचा उद्देश अनेक खेळाडू घडवायचे होते जेणेकरून ते खेळाडू ऑलम्पिक या लेव्हलवर भारताचे प्रतिनिधित्व करतील यासाठी त्यांनी व्यायाम शाळा ,शारीरिक शिक्षण महाविद्यालय स्थापन करण्याचा प्रयत्न केला एवढेच नाही तर नागपूर विद्यापीठमधील विभागामध्ये शारीरिक शिक्षण विभागाची स्थापना करून त्यांनी शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले असे याप्रसंगी प्रतिपादन केले.
त्यानंतर प्रमुख अतिथी मा. शकिलोद्दील काझी श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या 44 वी विदर्भ राज्यस्तरीय सीनियर महिला व पुरुष शूटिंग बॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनाचे प्रशंशा गेली व शूटिंग बॉल या खेळामध्ये इंटरनॅशनल लेव्हलर गेलेल्या स्पर्धकांची माहिती दिली. त्यानंतर प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे यांनी आपले प्रास्ताविक भाषण केले त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडले विकसित झाले आजवर संस्थेने अनेक खेळाडूंना आर्थिक मदत तसेच विशेष पारितोषिक देऊन त्यांचा गौरवकरून त्यांना सन्मानित करण्यात आले त्यामुळे आज आशियाई लेवलवर असो की अनेक स्पर्धांमध्ये संस्थेमध्ये शिकत असलेल्या खेळाडूंनी विशेष कामगिरी केली अनेक खेळाडू क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहे त्यावेळी 19 व्या आशियाई खेळात रजत पदक विजेता) खेळाडू तुषार शेळके त्याचा विशेष उल्लेख यावेळी केला. त्यानंतर लगेचच बक्षीस वितरांना सुरुवात झाली त्यानुसार सदर स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यांतील 10 महिला व 10 पुरुष संघांनी सहभाग घेतला होता. खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. अंतिम सामने अत्यंत चुरशीचे झाले. त्यामध्ये पुरुष मध्ये प्रथम विजेत्या बुलढाणा , द्वितीय उपविजेता अकोला, तृतीय उपविजेता वाशिम व महिलांमध्ये प्रथम विजेत्या बुलढाणा , द्वितीय उपविजेता वर्धा ,तृतीय उपविजेता अमरावती , संघांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक, पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाचे प्रा. जितेंद्र राऊत यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. बबनराव आवारे यांनी केले श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष गावंडे सचिव आयोजन समिती बबनराव आवारे सचिव अमॅच्युअर शुटींगबॉल असोशिएन अमरावती, संजय बढे कार्यकारी सदस्य अमॅच्युअर शुटींगबॉल असोशिएन अमरावती तसेच अमॅच्युअर शुटींगबॉल असोशिएनचे सर्व पदाधिकारी व श्री शिवाजी शारीरिक महाविद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारीनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजना यांनी अथक परिश्रम घेतले.




