मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार पुरस्काराने सन्मानित

अमरावती /26 डिसेंबर – श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127 व्या जयंती उत्सवाचा मुख्य सोहळा उद्या दि.27 डिसेंबरला सकाळी 11 वाजता श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्या लयाच्या भव्य प्रांगणात संपन्न होत आहे.या सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्य मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना ’ डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार ’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याला पद्मभूषण डॉ.विजय भटकर, केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव, महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण राज्यमंत्री ना.पंकज भोयर, राज्यसभा सदस्य खा.डॉ.अनिल बोंडे, खा. बळवंत वानखेडे, आमदार संजय खोडके, आमदार सुलभाताई खोडके, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रताप अडसड अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सकाळी 9 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख स्मृतीकेंद्र येथील भाऊसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात येऊन आदरांजली अर्पण करण्यात येईल. मुख्य सोहळ्यात शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार, शेतकरी नेता शरद जोशी उत्कृष्ट पुरुष शेतकरी पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख शेतीनिष्ठ पुरुष शेतकरी पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख क्रीडारत्न पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृती 2025 चे वितरण करण्यात येईल तसेच शिवसंस्था मासिक व दैनंदिनी 2026 चे विमोचन करण्यात येईल. या सोहळ्याला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ड. गजानन पुंडकर, ड.जे. व्ही.पाटील पुसदेकर, केशवराव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, प्राचार्य केशवराव गावंडे, सुरेशदादा खोटरे, प्रा.सुभाष बनसोड, स्वीकृत सदस्य प्राचार्य डॉ.अंबादास कुलट, विजय ठोकळ, डॉ. पुरुषोत्तम वायाळ, प्राचार्य डॉ.अमोल महल्ले प्रामुख्याने उपस्थित राहतील.या मुख्य सोहळ्याला सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे,अशी विनंती संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. वि. गो. ठाकरे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button