मतदार यादी प्रसिध्दीचा सुधारीत कार्यक्रम जाहीर
याद्या प्रसिध्दीस 3 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

अमरावती /26 डिसेंबर – महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 – 26 च्या अनुषंगाने मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्याबाबत माननीय राज्य निवडणूक आयोगाने दि.26/12/2025 रोजी आदेश जारी करुन सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मतदान केंद्र निहाय याद्या प्रसिद्ध करण्यासाठी शनिवार, दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महानगरपालिका निहाय संपूर्ण मतदारयादी जसजशी पूर्ण होईल तसतशी प्रसिद्ध करावी, असेही आयोगाच्या आदेशात नमूद केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नविन परिपत्रकानुसार 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम दिला असून त्यामधील मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्याबाबत सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. याबाबत राज्यातील सर्व 29 महापालिका आयुक्तांना सुचना करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी दुबार मतदार यादी केंद्रनिहाय अपलोड करण्यासाठी दि.27/12/2025 रोजी अपलोड करणे बंधनकारक केले आहे. तसेच मतदान केंद्रनिहाय मतदान यादी दि.03/01/206 पर्यंत संपूर्ण मतदार यादी जशी आहे तशी प्रसिध्द करण्यात यावी. असे सुचित करण्यात आले आहे. मतदार यादीत तयार करतांना तांत्रिक अडचणी आल्यास ईमेल द्वारे संपर्क साधण्यात यावा, असे सांगितले आहे. जर महत्वाची समस्या असल्यास दुरध्वनीवरुन संपर्क साधण्याच्या आयुक्तांना सुचना करण्यात आल्या आहेत. मतदान यादीचा कार्यक्रम आयोगाच्या https:// mahasec. maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.




