तक्षशिला महाविद्यालयात एआय राष्ट्रीय परिषद थाटात
सुमारे 500 पेक्षा अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधकांचा समावेश

अमरावती /26 डिसेंबर : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मैलाचा दगड ठरणार्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे तक्षशिला महाविद्यालय, अमरावती येथे पार पडली.
या परिषदेच्या माध्यमातून भारताच्या भविष्यातील परिवर्तनात बहुविद्याशाखीय दृष्टिकोनातून एआय, एनईपी, नवोन्मेष आणि उष्मायनाची भूमिका एक्सप्लोर करणे समाज विकासाचा राष्ट्रीय संवाद घडणारा होता. यामध्ये राज्यासह देश विदेशातील सुमारे 500 पेक्षा अधिक संशोधकांनी आपले प्रोजेक्ट पेपर सादर केले. यामध्ये जपान पासून तर आयआयटीचा समावेश होता. श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तक्षशिला महाविद्यालय आणि श्री संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय मंडळ दाभा संचालित श्री धाबेकर कला महाविद्यालयात खडकी,अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ही एक दिवसीय परिषद घेण्यात आली. परिषदेचे उद्घाटन सकाळी 11 वाजता तक्षशिला महाविद्यालय येथील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी उद्घाटनाला अमरावती विद्यापीठ कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते, श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल संस्थेच्या किर्ती अर्जुन, प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून आंध्र प्रदेश येथील आयआयआय टी’चे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. के. वेंकट सतीश, सचिव डॉ. कमलाकर पायस, प्रशासकीय अधिकारी प्रा. सचिन पंडित, अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे, तक्षशिला महाविद्यालय प्राचार्य डॉ माधुरी फुले, धाबेकर कला महाविद्यालय प्राचार्य डॉ. संजय देशमुख, विधी महाविद्यालय प्राचार्य डॉ वर्षा देशमुख, उपप्राचार्य प्रा. प्रितेश पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी उद्घाटन कार्यक्रमानंतर द्वितीय सत्राला सुरुवात झाली. यामध्ये द आयडिया ऑफ क्रियेटिव्हिटी इन द एज ऑफ एआय यावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गीविश इंग्रजी विभाग प्रा. डॉ. रविंद्र बोरसे, प्रमुख वक्ते लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय येथील प्रा. ज्ञानेश्वर गटकर उपस्थित होते. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक तक्षशिला महाविद्यालय प्राचार्य डॉ माधुरी फुले, उपप्राचार्य प्रा प्रितेश पाटील, डॉ. नवल पाटील, डॉ. प्रवीण वानखडे, डॉ. पंडित राठोड, डॉ. रविंद्र तायडे, डॉ. प्रणाली पेटे, डॉ. नीता तिवारी, डॉ. अमरीश गावंडे, डॉ. सुरेश पंडित, डॉ. संगीता लोकपुरे, डॉ. संदीप हाडोळे, डॉ. वर्षा गावंडे, सुभाष मुंडे, प्रा. निलेश गनगणे, प्रा. समीर चौधरी, प्रा. विशाल दिघे, प्रा. दिलीप वानखडे, प्रा. अंकुश लवटे, वक्ते डॉ. किशोर फुले, सिपना प्राचार्य डॉ. संजय खेरडे, डी टी इंगोले यांच्यासह तक्षशिला महाविद्यालय येथील जनसंवाद विभागाचे प्राध्यापक विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.




