पहिल्याच दिवशी 1 हजार 26 इच्छुकांकडून नामांकण अर्जाची उचल

अमरावती महापालिका निवडणुकीच्या नामांकण प्रक्रियेस प्रारंभ

* बडनेरा झोन क्र.4 मधून सर्वाधिक 236 अर्जाची उचल

* पहिल्या दिवशी एकही नामांकण अर्ज दाखल झाला नाही

अमरावती/ 23 डिसेंबर – महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी इच्छुकांनी विक्रमी 1026 नामांकन अर्जाची उचल केली. अर्ज कोणीच दाखल केला नाही. प्रतिसाद पाहता यंदा उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
अर्ज उचल व दाखल करण्याच्या प्रक्रियेसाठी मनपा प्रशासनाने 7 झोन कार्यालय तयार केले आहे. त्या झोन अंतर्गत येर्याख प्रभागातल्या उमेदवारांना सदर कार्यालयातूनच अर्जाची उचल करून तो दाखल करायचा आहे. त्यानुसार मंगळवारपासून अर्जाची उचल सुरू झाली. पहिल्या दिवशी झोन 1 कार्यलयातून 169, झोन 2 कार्यालयातून 143, झोन 3 कार्यालयातून 115, झोन 4 कार्यालयातून 174, झोन 5 कार्यालयातून 103, झोन 6 कार्यालयातून 86, सर्वात जास्त झोन 7 कार्यालयातून 236 अशी एकूण 1026 अर्जाची उचल झाली. कोणत्याच इच्छुकाने अर्ज दाखल केला नाही. बुधवारपासून अर्ज दाखल होऊ शकतात.
अर्जाची झोननिहाय उचल-उत्तरझोन क्र.1 रामपुरी कॅम्प – 169, नवीन तहसील कार्यालय – 143, मध्यझोन क्र. 2 राजापेठ – 115, पुर्व झोन क्र. 3 दस्तुर नगर – 174, मनपा शिक्षण विभाग अंबापेठ – 103, जुनी तहसील कार्यालय – 86, दक्षिण झोन क्र. 4 बडनेरा -236-एकुण- 1026

संबंधित बातम्या

Back to top button